शिक्षक प्रभाकर क्षिरसागर सेवानिवृत्त निमित्ताने सहपत्निक सन्मान
1 min read

शिक्षक प्रभाकर क्षिरसागर सेवानिवृत्त निमित्ताने सहपत्निक सन्मान

Loading

शिक्षक प्रभाकर क्षिरसागर सेवानिवृत्त निमित्ताने सहपत्निक सन्मान

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे शाळेचे इंग्रजी विषयाचे शिक्षक श्री प्रभाकर नामदेव क्षीरसागर हे नियत वयोमानानुसार‎ वयाच्या ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त झाले. त्यांना शाळेच्या वतीने निरोप समारंभ देण्यात आला. शाळेचे प्रशासन अधिकारी माननीय श्री जी.टी.टाक यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ०१ डिसेंबर रविवार रोजी हा कार्यक्रम पार पडला.शाळेचे अध्यक्ष माननीय श्री महेंद्र कोठारी उपाध्यक्ष आप्पासाहेब यादव किसन चौधरी तसेच सर्व संचालक मंडळ मुख्याध्यापक श्री डी. डी.जाधव
तथा शाळेचे माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक कळमसरे गावाचे सरपंच, उपसरपंच व सर्व शिक्षक उपस्थित होते.‎
सेवानिवृत्त शिक्षक प्रभाकर क्षीरसागर यांच्या सेवानिवृत्ती बद्दल मुख्याध्यापक शिक्षक व संचालक मंडळ यांनी मनोगत व्यक्त करत त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *