मनरेगा अंतर्गत कुशल कामांसाठी 3 मीटरची अट शिथिलतेसाठी खासदारांना साकडे  जळगांव लोकसभेचे खासदार स्मिताताई वाघ यांच्याकडे मागणी
1 min read

मनरेगा अंतर्गत कुशल कामांसाठी 3 मीटरची अट शिथिलतेसाठी खासदारांना साकडे जळगांव लोकसभेचे खासदार स्मिताताई वाघ यांच्याकडे मागणी

Loading

मनरेगा अंतर्गत कुशल कामांसाठी 3 मीटरची अट शिथिलतेसाठी खासदारांना साकडे

जळगांव लोकसभेचे खासदार स्मिताताई वाघ यांच्याकडे मागणी

पारोळा (प्रतिनिधी) – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम महाराष्ट्र योजनेतंर्गत कुशल प्रमाणात सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लॉक यासारखी कामे लोकसभा निवडणुकापूर्वी शासनाने मोठ्या प्रमाणावर मंजुर केलेली होती, त्या कामांना तालुका प्रशासनाने प्रस्ताव अंती ग्रामपंचायत स्तरावर सुध्दा मंजुरी दिलेली आहे त्याप्रमाणे गावस्तरावर भौगोलिक परिस्थितीनुसार गल्लीतील लहान मोठे १५ ते २० फूट रुंदीचे रस्ते किंवा गावातील चौक, शाळा किंवा अंगणवाडी परिसर, मंदिर परिसर अशी बरीचशी कामे करण्यात आलेली आहेत ही कामे शासनाच्या इतर योजनेत करता येत नाहीत म्हणुन अशा प्रकारची कामे मनरेगात केली जातात सदरची कामे झालेवर नरेगा आयुक्त नागपुर यांचेकडील दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजीचे पत्र जिल्हास्तरावर आले त्यानंतर तालुक्यांच्या ठिकाणी पत्र यायला वेळ गेला त्यात पुढे विधानसभा निवडणुक आचासंहिता लागु झाली त्यामुळे झालेल्या कामांचे कुशल बिले सादर करण्यास सदरच्या पत्रामुळे अडचणी निर्माण झालेल्या आहेत म्हणुन गाव पातळीवर केलेल्या मनरेगा कुशल कामांची पेमेंट काढणे दिवसेंदिवस जिकरीचे होत आहे त्याबाबत सध्या प्रशासकीय मार्गदर्शन मिळत नाही म्हणुन जळगांव लोकसभेच्या खासदार स्मिताताई वाघ यांना भेटून जिल्ह्यातील मनरेगा अंतर्गत सिमेंट रस्ता, पेव्हर ब्लॉक कुशल कामांची ३ मीटरची अट शिथिल करण्यासाठी निवेदन देण्यात आले निवेदित करतांना खासदार स्मिताताई यांनी सांगितले की, सदरचा प्रश्न झिरो हॉवर्सला मांडून निकाली काढण्याचे काम केले जाईल, निवेदन देतांना डॉ. दिनकर पाटील माजी कृषी सभापती जि. प. जळगांव तसेच सुरेश पाटोळे, जिल्हाध्यक्ष, ग्रामरोजगार सहाय्यक संघटना महाराष्ट्र राज्य आदि उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *