आर एस पी युनिट कमांडर- डॉ.मनिलाल शिंपी, “वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 ने सन्मानित,  ठाणे येथे भाजपा शिक्षक आघाडी व समन्वय प्रतिष्ठान तर्फे वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न.
1 min read

आर एस पी युनिट कमांडर- डॉ.मनिलाल शिंपी, “वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 ने सन्मानित, ठाणे येथे भाजपा शिक्षक आघाडी व समन्वय प्रतिष्ठान तर्फे वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न.

Loading

*आर एस पी युनिट कमांडर डॉ.मनिलाल शिंपी “वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 ने सन्मानित.*

*ठाणे येथे भाजपा शिक्षक आघाडी व समन्वय प्रतिष्ठान तर्फे वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न.*

*ठाणे जिल्ह्यात आर एस पी युनिटचे कार्य उल्लेखनीय व अभिमानास्पद आहे: आ. निरंजन डावखरे.*

ठाणे कल्याण( मनिलाल शिंपी) दि.१/१२/२४ रविवार रोजी एम एच हायस्कूलचे ठाणे येथे भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी कोकण विभाग व समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार अँड.निरंजनजी डावखरे यांच्या संकल्पनेतून”वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४,” सोहळा उत्साहात साकारला. ठाणे पालघर नाशिक विभागीय आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर व मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे राज्यप्रमुख डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी यांना त्यांच्या सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल *वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४,”* ठाणे येथील तिसऱ्यांदा बहुमताने निवडून आलेले आमदार संजयजी केळकर व कोकण पदवीधर आमदार ऍड. निरंजन डावखरे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक देण्यात आला. यावेळी ठाणे नवी मुंबई पालघर नाशिक विभागाचे विभागीय आर एस पी समादेशक श्री. दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे शहर समादेशक, एम एच हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.सुनील पाटील, ठाणे जिल्हा अतिरिक्त समादेशक डॉ.जितेंद्र सोनवणे, भिवंडी शहापूर तालुका समादेशक श्री. मंगेश भामरे,ठाणे जिल्हा उपसमादेशक श्री.विनोद शेलकर,अंबरनाथ बदलापूर चे श्री.दत्तात्रय पाटील, मुख्याध्यापक, व आर एस पी अधिकारी श्री. दत्तात्रय पटवर्धन, टिटवाळा परिसराचे समादेशक श्री.विजय भामरे, आर एस पी अधिकारी श्री. गोकुळ गवळे,श्री मधुकर पाटील, श्री करणसिंह जडेजा, श्री. पवार सर, श्री. सुनील कोळी, घाटकोपर समादेशक श्री.तुकाराम साळुंखे, श्री. मारुती जाधव यांच्यासह महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटना नागपूर अंतर्गत असलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल व विधानसभा निवडणुकीत जिल्हाधिकारी ठाणे यांचा आदेशानुसार निवडणूक अधिकारी व विशेष पोलीस अधिकारी म्हणून उत्कृष्ट रित्या कर्तव्य करत प्रशासनाला निवडणूक कामात मोलाचे योगदान दिले त्याबद्दल भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी कोकण विभाग व समन्वय प्रतिष्ठान यांच्यावतीने संपूर्ण आर एस पी अधिकारी शिक्षक युनिटचे कोकण विभागाचे लोकप्रिय पदवीधर आमदार आदरणीय अँड. निरंजनजी डावखरे, विद्यमान नवनिर्वाचित तिसऱ्यांदा ठाण्यातून बहुमताने निवडून आलेले आमदार श्री.संजयजी केळकर साहेब, तसेच कोकण विभागाचे लाडके आणि शिक्षकांची सावली असणारे आमचे ज्ञानेश्वर माऊली आदरणीय शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी विशेष कौतुक आणि अभिनंदन केले. महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटनेचे अध्यक्ष श्री संजय शेंडे, उपाध्यक्ष श्री. पी एस महाजन, सचिव श्री. श्याम फाळके, प्रशिक्षण प्रमुख श्री. पोहरे सर, कायदेविषयक राज्य सल्लागार अँड.के.डी.पाटील, प्रसिद्धी प्रमुख दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील यांच्यासह अहिल्यानगर बीड विभागीय समादेशक डॉ. सिकंदर शेख, डॉ. सोमनाथ बोंतले यांनीही “वसंत स्मृती आदर्श शिक्षक 2024 चे समानार्थी डॉ. मणिलाल शिंपी यांच्यासह संपूर्ण आरएसपी अधिकारी टीमचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे.भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीचे कोकण विभाग प्रदेश संयोजक श्री. विकास पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री एन एम भामरे, संयोजक श्री. किशोर पाटील, कोकण पदवीधर प्रकोष्ट संयोजक श्री.सचिन मोरे, व सहसंयोजक उत्कृष्ट निवेदक श्री विनोद शेलकर यांच्यासह कोकण विभाग भाजपा शिक्षक आघाडी कडून संपूर्ण आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट ला पुढील काळात यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देत अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *