मुलांनो चांगली संगत सोबत, व खेळाची आवड निर्माण करा फायदा होईल. : गुलाबराव पाटील  आई-बाबांशी मित्र-मैत्रिणीसारखे वागा- आमदार सुलभाताई गायकवाड
1 min read

मुलांनो चांगली संगत सोबत, व खेळाची आवड निर्माण करा फायदा होईल. : गुलाबराव पाटील आई-बाबांशी मित्र-मैत्रिणीसारखे वागा- आमदार सुलभाताई गायकवाड

Loading

मुलांनो चांगली संगत सोबत, व खेळाची आवड निर्माण करा फायदा होईल. : गुलाबराव पाटील

आई-बाबांशी मित्र-मैत्रिणीसारखे वागा-
आमदार सुलभाताई गायकवाड

*ठाणे:कल्याण* ( मनिलाल शिंपी)- कल्याण पूर्व येथील पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक शाळेच्या क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली असून क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी कल्याण पूर्वेच्या नवनिर्वाचित आमदार सुलभाताई गणपत गायकवाड , कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सेवानिवृत्त प्राचार्य अंकुर आहेर व संस्थेचे अध्यक्ष पी.टी. धनविजय तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील प्रार्थमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुजाता नलावडे उपस्थित होते.संस्था व शाळेच्या वतीने आमदार सुलभा गायकवाड यांचा यशोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सुलभा गायकवाड म्हणाल्या मुलांनो तुम्ही दहावीनंतर तुमच्या आवडीचे शिक्षण घ्या. आई-बाबांसोबत मित्र मैत्रिणी सारखे वागा तुमचे म्हणणे आई बाबांना सांगत चला चांगली संगत सोबत निवडा त्याचा फायदा तुम्हाला होईल. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम म्हणाले आरोग्यासाठी खेळ महत्त्वाचा आहे ज्या खेळाची आवड असेल तो खेळा परंतु गुन्हेगारी प्रवृत्ती पासून लांब राहा आजच तुम्ही अशी शपथ घ्यायची आहे आम्ही आयुष्यभर व्यसनाधीन होणार नाही. व्यसनामुळे आरोग्य खराब होते आरोग्याची काळजी घ्या. शिवछत्रपती पुरस्कार विजेते अंकुर आहेर म्हणाले खेळाडू हे बालपणापासून तयार होतात अभ्यासाबरोबर खेळ खेळा. आताच आपण ध्येय समोर ठेवून खेळा मला पुढे ऑलिम्पिक खेळाडू बनायचं आहे चार दिवस चालणाऱ्या क्रीडा महोत्सवात टेबल टेनिस, बुद्धिबळ, क्रिकेट, कबड्डी, खो-खो अशी वेगवेगळी सांघिक व वैयक्तिक खेळ खेळले जाणार आहेत. पाहुण्यांचा परिचय आणि प्रास्ताविक मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी केले. गणेश पाटील यांनी संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *