एल बी फाऊंडेशनचा अमळनेर येथील गरीब व गरजु कुटुंबाला मदतीचा हात.
1 min read

एल बी फाऊंडेशनचा अमळनेर येथील गरीब व गरजु कुटुंबाला मदतीचा हात.

Loading

एल बी फाऊंडेशनचा अमळनेर येथील गरीब व गरजु कुटुंबाला मदतीचा हात.

अमळनेर प्रतिनिधी- एकेकाळी आपल्या मुलीच्या मदतीच्या बळावर ज्यांनी आपल्या जीवनातील संघर्षमय प्रवास पार केला असे गुलाबबेग मिर्झा यांच्या आयुष्याची वाट अधिक बिकट झाली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की पत्निच्या मृत्यू नंतर खचुन न जाता तांबेपुरा येथील रहिवासी गुलाबबेग मिर्झा यांनी मुलीच्या मदतीने आपला खमंग विकण्याच्या व्यवसाय सुरूच ठेवला. ते सायकली ने फिरून खमंग विक्री करत असत मात्र वयोमानानुसार त्यांना सायकल चालवणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी दुचाकीवरून आपला विक्रीचा व्यवसाय सुरूच ठेवला.
मात्र त्यांच्या जीवनातील संघर्ष काही केल्या संपतच नव्हतं त्यातच ज्या मुलीच्या मेहनतीने ते खमंग तयार करून गावोगावी व शहरात विकत होते त्याच मुलीला अर्धांगवायूचा झटका आला व तिच्या शरीराचा अर्ध भाग निकामी झाला म्हणून गुलाबबेग मिर्झा यांच्यावर उपासमारीची वेळ आली.
म्हणून त्यांना अशा संकटात मदतीचा हात म्हणून मुबंई येथील एल बी फाऊंडेशन यांनी मदतीचा हात दिला. मंगळ ग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस एन पाटील व रियाज भाई यांच्या हस्ते या कुटूंबाला मदत देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *