अमळनेरला प्रताप महाविद्यालयात संविधान दिन साजरा
![]()
अमळनेरला ‘प्रताप’ मध्ये संविधान दिन साजरा
———————————————-
अमळनेर प्रतिनिधी: खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात संविधान दिनाचा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने सन 2024 – 25 या संविधान अमृत महोत्सवी वर्ष साजरा करण्याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या द्वारे 10 ऑक्टोबर 2024 रोजी घेण्यात आला.
26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे निर्देश केंद्र शासनाने सन 2015 पासून दिले ; सन 2015 मध्ये पहिल्यांदा संविधान दिन भारतात साजरा करण्यात आला. दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी दहावे संविधान दिन प्रताप महाविद्यालयाच्या कार्यालयापुढे विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर वृद्ध यांच्या समक्ष मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सुरुवातीला नेहमीप्रमाणे सकाळी 11 वाजता राष्ट्रगीत घेण्यात आले त्यानंतर 26.11.2008 मध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले वीर जवान,विदेशी नागरिक व असंख्य भारतीय जखमी झाल्याची घटना ‘काळा दिवस’ म्हणून आपण साजरा करतो म्हणून हा दिवस शहीद दिन लक्षात घेऊन या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्यांना यावेळी दोन मिनिटे मौन धारण करून श्रद्धांजली देण्यात आली. तदनंतर राष्ट्रीय संविधान दिन साजरा करण्यात आला,कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण जैन यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी-प्राध्यापक-शिक्षकेतर वृंद यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भारतीय संविधानांतर्गत प्रस्तावनेत निहीत असलेला सरनामा किंवा उद्देश पत्रिका याचे महत्व व संविधानांतर्गत असणाऱ्या मूल्यांचे संवर्धन किती गरजेचे आहे याबद्दल उपप्राचार्य डॉ.विजय तुंटे यांनी उपस्थित सर्वांना माहिती दिली.त्यानंतर उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन यावेळी घेण्यात आले उपप्राचार्य डॉ.व्ही बी मांटे यांनी उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन केले आणि त्यांच्या सह सर्व विद्यार्थ्यांनी उद्देश पत्रिकेतील अंतर्भूत असणाऱ्या शब्दांचे उच्चारण केले. यावेळी कार्यालयापुढे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण जैन , खानदेश शिक्षण मंडळाचे सहसचिव डॉ.धीरज वैष्णव,कुलसचिव राकेश निळे, उपप्राचार्य योगेश तोरवणे,परीक्षा नियंत्रक प्रा.शशिकांत जोशी आदी उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर वृंद यांच्यासह असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

सीसीएमसी विभागात डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन
———————————————–
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला समतेचे संविधान दिले. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करताना डॉ.आंबेडकर यांच्या अभ्यासिकांशी असणारा संबंध लक्षात घेऊन अभ्यासिकेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन उपप्राचार्य डॉक्टर अमित पाटील, प्रा.वृषाली वाकडे, प्रा.पुष्पा पाटील, प्रा.भाग्यश्री जाधव डॉ.आर सी सरवदे,ग्रंथपाल दिपक पाटील,डॉ.रवी बाळसकर,डॉ.तुषार रजाळे यांनी केले तर डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार डॉ.जितेंद्र पाटील,प्रा विजय साळुंखे,डॉ.मुकेश भोळे,प्रा.संतोष दिपके,डॉ.ज्ञानेश्वर मराठे यांनी अर्पण केले. यावेळी संविधान ग्रंथांचे देखील पूजन प्रा.रोहन गायकवाड,प्रा.अनिल झळके,प्रा.रामदास सुरळकर,डॉ.बालाजी कांबळे यांनी केले.
यावेळी उपस्थित अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांपुढे उद्देशपत्रिकेचे सामूहिक वाचन प्रा.संतोष दिपके यांनी केले. प्रस्तुत कार्यक्रम प्रसंगी अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्षचे प्रमुख डॉ.मुकेश भोळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.तुषार रजाळे,सहाय्यक विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. रवि बाळसकर,प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.आर.सी.सरवदे,प्रा.प्रमोद येवले,ग्रंथपाल दिपक पाटील, प्रा. रामदास सुरळकर,प्रा.एस.टी. बागुल,डॉ. प्रियंका पाटील,प्रा.अनिल झळके प्रा.नितेश कोचे, प्रा.रोहन गायकवाड, डॉ. बालाजी कांबळे, डॉ. ज्ञानेश्वर मराठे यांच्यासह असंख्य विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
प्रस्तुत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात प्राचार्य डॉ.अरुण जैन,सहसचिव डॉ.धिरज वैष्णव यांनी मार्गदर्शन केले तर कैलास पाटील,साबीर शेख,दिलीप शिरसाठ,पराग पाटील,अतुल राजपूत यांनी सहकार्य केले.प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विजय तुंटे यांनी केले.

