पूर्वेत भाजपाच्या सुलभा गायकवाड 26 हजार 408 मतांनी विजयी
1 min read

पूर्वेत भाजपाच्या सुलभा गायकवाड 26 हजार 408 मतांनी विजयी

Loading

पूर्वेत भाजपाच्या सुलभा गायकवाड 26 हजार 408 मतांनी विजयी

*शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांचा दारुण पराभव*

कल्याण 🙁 मनिलाल शिंपी)कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात झालेल्या तिरंगी लढतीत महायुतीच्या वतीने भाजपाच्या उमेदवार सुलभा गणपत गायकवाड यांना एकूण 81 हजार 516 इतकी विक्रमी मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्थी शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांना 55 हजार 108 इतकी मते मिळाली तर महा विकास आघाडीच्या माध्यमातून उभे असलेले शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (उबाठा गट) धनंजय बोडारे यांना 39 हजार 512 इतक्याच मतांवर समाधान मानावे लागले. या तिरंगी लढतीत भाजपाच्या सुलभा गायकवाड यांनी 26 हजार 408 इतक्या मतांची आघाडी घेवून विजय प्राप्त केला आहे.

आठ महिन्यापूर्वी भाजपाचे माजी आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या शीत युध्दाचा भडका होत गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशन मध्ये महेश गायकवाड यांच्यावर केलेला गोळीबार यांतून हा संघर्ष राजकीय अस्तित्वाच्या लढाई पर्यंतच्या शिगेच्या टोकाला पोहचला. यातूनच सुलभा गायकवाड यांच्या माध्यमातून त्यांना राजकीय प्रवासात आणण्यासाठी भाजपाने पुढाकार घेत संभाव्य भाजपा उमेदवार म्हणून विधानसभा निवडणुकीत रिगंणात उतरविले. महायुतीच्या गणितामुळे शिंदेगट इच्छुक उमेदवाराचा भ्रमनिरास झाला. परंतू शिवसेना शिंदेगटाचे महेश गायकवाड यांनी आपली बंडखोरी कायम ठेवली तर शिंदेगटाचे विशाल पावशे यांनी वंचित बहुजन आघाडी तून तिकीट मिळवित उमेदवारी कायम केली.

या नाट्यमय घटनामध्ये शिवसेना उबाठा गटाचे धंनजय बोडारे यांनी आपली उबाठा ची उमेदवार कायम करीत महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळविला. दोन गायकवाडांच्या लढतीत धनंजय बोडारे यांचा वरचष्मा होईल असे राजकीय तज्ञाचे मत होते. पंरतु कल्याण पूर्वेतील महेश गायकवाड यांचा जनसंपर्क वर्गाशी असलेला नाळ यांच्या जोरावर तसेच शिंदेगटाचे वजनदार माजी नगरसेवक यांचा छुपा पाठिंबा यामुळे महेश गायकवाड यांना दुसऱ्या क्रमांकाची मते प्राप्त झाली. तर सुलभा गायकवाड यांनी विजयश्री खेचून आण्यासाठी स्थानिक भाजपा पदाधिकारी यांच्यावर ठेवलेला विश्वास तसेच वाढविलेला लोकसंपर्क आणि महायुती वरील विश्वास यांचा मोठा वाटा त्यांच्या विजयात असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *