*अमळनेर तालुक्यातील दिव्यांगांचा शिरिषदादा चौधरी यांचाच पाठिंबा…*
![]()
*अमळनेर तालुक्यातील दिव्यांगांचा शिरिषदादा चौधरी यांचाच पाठिंबा…*
प्रतिनिधी: अमळनेर तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातील दिव्यांगांनी शिरीषदादा चौधरी यांना बहुमतांनी विजयी करण्याचा संकल्प केला आहे. अनेक आमदार आले आणि गेले परंतु दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी व रोजगारासाठी कुठल्याही आमदाराने पुढाकार न घेता, केवळ आम्ही करू, करून दाखवू अशी खोटी आश्वासने देत सत्तेत आल्यावर मात्र त्या आश्वासनाकडे दुर्लक्ष करून, फक्त स्वतःचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याकडेच त्यांनी लक्ष दिल्याचे चित्र दिसून येते.
परंतु या विधानसभा निवडणुकीत सर्व दिव्यांग बांधवांनी एकच निर्धार पक्का केला की, अपक्ष उमेदवार शिरीषदादा चौधरी यांनी बहुमतांनी विजयी करून, दिव्यांग व्यक्तींना समाजात हक्काची जागा मिळावी. म्हणून, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष- योगेश पवार यांनी शिरीषदादा चौधरी यांना जास्तीत जास्त मतदान करून, विजयी करावे. प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष- वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी तालुक्यातील सर्व दिव्यांगांनी ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

