जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेरचा उपक्रम.. पर्यावरण विषयक केली जनजागृती
![]()
जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेरचा उपक्रम..
पर्यावरण विषयक केली जनजागृती
अमळनेर प्रतिनिधी
दिनांक 14 नोव्हेंबर ,व 15 नोव्हेंबर मंगळग्रह मंदिर येथे वर राजा भगवान श्री विष्णुजी व वर राणी माता श्री तुलसीदेवी यांच्या प्रतिमांच्या स्थापना करण्यात येणार असल्याने त्या निमित्ताने या प्रतिमांची शोभा यात्रा सह पर्यावरण विषयक जनजागृती करण्यासाठी वृक्ष दिंडी ची ही आयोजन करण्यात आले होते . त्या निमित्ताने सकाळी 9 वाजता वाडी चौक येथून जवळपास 1500 शाळकरी विद्यार्थी व शोभा यात्रेत सहभागी झालेले सेवेकरी व नागरिकांचा समावेश या शोभा यात्रेत होता त्या योगे जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर यांचा ही त्यात
सहभाग असावा म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री महाले सर यांनी चॉकलेट, बिस्किटे,खान पान आपणा तर्फे देता आली तर आपण द्या अशी विनंती पत्र आज रोजी जायन्ट्स ग्रुप ला मिळाले त्या नन्तर जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर सदस्यांनि निर्णय घेऊन गुरुवारी 14 नोव्हेंबर ला सकाळी 9,30 वाजता डॉक्टर अंजली चव्हाण यांच्या रुग्णसेवा हॉस्पिटल समोर उभे राहून सर्वांना चॉकलेट वाटप केले ,मंगळ ग्रह संस्थानाच्या वतीने जायन्ट्स ग्रुप चे आभार मानण्यात आलेत ,, याप्रसंगी उपस्थित जायन्ट्स अध्यक्ष सुनील पाटील, उपाध्यक्ष रमेश महाजन, सेक्रेटरी प्रशांत पाटील, खजिनदार ,, ऍड राजेंद्र चौधरी, नवसदस्य ,जायन्ट्स श्री ,,चंदूनाना बडगुजर सर, प्रो, प्रवीण भावसार सर, दीपक मणीलाल पा, भटू पाटील, महेश पाटील , संदीप महाजन सर ,, रवींद्र घनश्याम पाटील , संतोष वाघ ,प्रदीप शिंगाने हे उपस्थित होते त्यानी सर्वांना चॉकलेट वाटप केले,,,
विशेष म्हणजे जायन्ट्स ग्रुप ला वरून कुठलाही निधी प्राप्त होत नाही ,, हे सर्व उपक्रम स्वखर्चाने राबविले जातात ,, जायन्ट्स चा हा 14 वा उपक्रम होता .


