उच्च शिक्षणात सायबर सुरक्षा,परस्पर कौशल्य व देहबोली महत्त्वाचे- चंद्रकांत शर्मा(मुंबई)यांचे प्रतिपादन
1 min read

उच्च शिक्षणात सायबर सुरक्षा,परस्पर कौशल्य व देहबोली महत्त्वाचे- चंद्रकांत शर्मा(मुंबई)यांचे प्रतिपादन

Loading

उच्च शिक्षणात सायबर सुरक्षा,परस्पर कौशल्य व देहबोली महत्त्वाचे- चंद्रकांत शर्मा(मुंबई)यांचे प्रतिपादन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन): येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत), अमळनेर च्या अंतर्गत एफडीपीच्या समारोप प्रसंगी सी.टी.एस.सी,मुंबई येथील श्री.चंद्रकांत शर्मा यावेळी बोलत होते.दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी पूज्य साने गुरुजी सभागृहात दुपारी चार ते पाच दरम्यान एफडीपीचा समारोप समारंभ पार पडला.
यावेळी विचार मंचावर प्रमुख मार्गदर्शक श्री चंद्रकांत शर्मा,खानदेश शिक्षण मंडळाचे सहसचिव डॉ.धीरज वैष्णव,रुसा समन्वयक व अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्षचे प्रमुख डॉ.मुकेश भोळे,उपप्राचार्य प्रा.पराग पाटील डॉ.विजय तुंटे,डॉ.अमित पाटील,डॉ.योगेश तोरवणे व एफडीपीचे समन्वयक डॉ.अमोल मानके हे यावेळी उपस्थित होते.
दिनांक 14 ते 12 नोव्हेंबर 2024 दरम्यान एफडीपी ची कार्यशाळा संपन्न झाली.या तीन दिवसीय कार्यशाळेत एकूण सहा महत्त्वपूर्ण विविध विषयावर व्याख्याने झाली.श्री.चंद्रकांत शर्मा (मुंबई) यांनी उपस्थित प्राध्यापक वर्गास उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना आणि प्राध्यापक एक समुदाय म्हणून परस्पर कौशल्य कसे विकसित करावे तसेच इतरांशी संवाद साधताना आपली देहबोली कशी असावी, कृत्रिम बुद्धिमत्ता यावर सुद्धा माहिती देण्याचे कार्य चंद्रकांत शर्मा यांनी पार पाडले, सध्या केंद्र व राज्य शासनाने विद्यापीठीय व महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात सायबर सुरक्षा हा महत्त्वाचा पेपरचा अंतर्भाव केल्यामुळे विद्यार्थ्यांना अद्ययावत माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून, संवाद साधण्याच्या दृष्टिकोनातून ही कार्यशाळा उपयुक्त ठरली.यावेळी तीन दिवसीय कार्यशाळेत जवळपास 122 प्राध्यापकांनी आपला सहभाग नोंदविला समारोप प्रसंगी डॉ. निलेश चित्ते,डॉ.सचिन पाटील,प्रा.वृषाली वाकडे यांना प्रतिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सहसचिव डॉक्टर धीरज वैष्णव यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.धीरज वैष्णव म्हणाले की, प्रस्तुत कार्यक्रम महाविद्यालयाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे आणि अशा प्रकारच्या कार्यशाळेमुळे उच्च शिक्षणातील गुणवत्ता कायम राहण्यास मदत होते.
याप्रसंगी कार्यशाळेच्या यशस्वीते करिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण जैन यांचे मार्गदर्शन मिळाले.

 

स्टाफ प्रबोधिनी समितीचे सन्माननीय सदस्य डॉ. विजय मांटे, डॉ.रवींद्र मराठे,प्रा.जयेश साळवे, प्रा.ज्ञानेश्वर कांबळे,डॉ.विलास गावित,
डॉ.किरण भागवत, प्रा.विजय साळुंखे,
डॉ.रामदास सुरळकर यांच्यासह प्रा.निलेश पवार, डॉ.रवी बाळसकर, डॉ.जितेंद्र पाटील, प्रा.संतोष दिपके,डॉ.आर सी सरवदे,डॉ.माधव भुसनर,ग्रंथपाल दिपक पाटील,कुलसचिव राकेश निळे,भटू चौधरी, कैलास पाटील आदींनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *