काकांच्या वाढदिवसाला ग्रामीण रुग्णालयात गरजूंना फळे वाटप युवा उद्योजक मोन्टी साळीचा उपक्रम
![]()
काकांच्या वाढदिवसाला ग्रामीण रुग्णालयात गरजूंना फळे वाटप
युवा उद्योजक मोन्टी साळीचा उपक्रम
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील युवा उद्योजक अक्षय उर्फ मॉन्टी प्रताप साळी यांनी आपल्या काकांच्या वाढदिवसाच्या विशेष दिवशी एक सुंदर उपक्रम घेतला. त्यांनी आपल्या काकांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ग्रामीण रुग्णालयात गरजू रुग्णांना फळे आणि बिस्किटांचे वाटप केले. यावेळी त्यांच्यासोबत श्री भद्रा प्रतीक उद्योग समूहाचे संस्थापक आणि बँकेचे संचालक श्रीमान आबासाहेब दीपक छबुलाल साळी यांचे योगदान सामाजिक क्षेत्रांत अभिनंदनीय आहे..
या उपक्रमाने उपस्थित रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय मनःपूर्वक आनंदित झाले. युवा उद्योजक मॉन्टी साळी यांचे हे योगदान केवळ त्यांच्या काकांप्रतीच नाही तर समाजाच्या प्रगतीसाठी देखील प्रेरणादायक आहे. या उपक्रमामुळे त्या कुटुंबाचे अतूट नाते आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व सर्वत्र कौतुकाचा विषय ठरले आहे.
अशा प्रकारचे सामाजिक कार्य प्रेरणादायक ठरत असले तरी हे आमच्या समाजात आवश्यक असलेले योगदान आहे. आशा आहे की, इतरांसाठीही याप्रमाणे उपक्रम राबवले जातील आणि समाजातील गरजूंना मदत करण्याची प्रेरणा मिळेल युवा उदयोजक असे मोन्टी यांनी सांगितले.


