विद्यार्थ्यांनी आई-वडिलांना पत्राद्वारे केली मतदानाची याचना,देवगाव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलचा उपक्रम
1 min read

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांना पत्राद्वारे केली मतदानाची याचना,देवगाव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलचा उपक्रम

Loading

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांना पत्राद्वारे केली मतदानाची याचना

देवगाव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलचा उपक्रम

अमळनेर प्रतिनिधी
देवगाव देवळी, ता. अमळनेर – महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना मतदानाची जनजागृती करत दिलेले पत्र यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खूप चैतन्य निर्माण केले आहे. विद्यार्थ्यांनी पत्रात पत्रिकेच्या माध्यमातून आपल्या आई-वडिलांना त्यांच्या कष्टांची आठवण करून देत, 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क वापरण्याची विनंती केली आहे.
पत्रात लिहिण्यात आले आहे की, “आई बाबा, तुम्ही राबराब राबून आम्हाला चांगले शिक्षण मिळवून देत आहात. तुमच्या कष्टांचे मोल आम्ही जाणतो. आता आपले कर्तव्य आहे की, आम्हाला भविष्यात चांगले शिक्षण ,आरोग्य, शासकीय योजना मिळाव्या यासाठी तुम्ही मतदान करा आणि लोकशाहीला बळ द्या.”

शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि त्यांना मतदानाच्या महत्त्वाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच, यावेळी उपस्थित असलेल्या अरविंद सोनटक्के, आय.आर.महाजन, एस.के.महाजन, एच.ओ.माळी शिक्षकांनीही या अभिनव कृत्याचे समर्थन केले. देवगाव देवळी येथील विद्यार्थ्यांच्या आधारे जनजागृती मोहिमेत चैतन्य निर्माण केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह
पालकांमध्ये उत्साह वाढला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *