डॉ अनिल शिंदे: ग्रामीण विकासाचे प्रतीक आणि महाविकास आघाडीचे विश्वासपात्र”उमेदवार-काग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गजेंद्र पाटील
![]()
“डॉ अनिल शिंदे: ग्रामीण विकासाचे प्रतीक आणि महाविकास आघाडीचे विश्वासपात्र”उमेदवार-काग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गजेंद्र पाटील
अमळनेर प्रतिनिधी – महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार, डॉ अनिल नथ्थू शिंदे यांना ग्रामीण भागातून अपार प्रेम आणि समर्थन मिळत आहे. स्थानिक जनतेच्या मनामध्ये मजबूत स्थान मिळवणारे डॉ शिंदे आता या निवडणुकीत प्रमुख चर्चेचा विषय बनले आहेत. ग्रामीण भागातील वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ठ कामामुळे जनतेत त्यांची खूपच प्रतिष्ठा आहे. असेकाग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गजेंद्र पाटील यांनी सांगितले.
तालुक्यातील विविध ठिकाणी त्यांच्यावर चांगला प्रतिसाद मिळत असल्याने, “आता दादा नको डॉ अनिल शिंदे पाहिजे” हे स्पष्टपणे ऐकायला मिळत आहे. महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीतचा जाहिरनामा सर्व सामान्य माणसाला केंद्र मानून तयार करण्यात आलेला आहे, जेणेकरून प्रत्येक नागरिकाच्या गरजा लक्षात घेतल्या जाव्यात.
डॉ अनिल शिंदे यांनी निवडणूक जिंकल्यानंतर तालुक्यातील विकासासाठी आपली कटिबद्धता व्यक्त केली आहे आणि ते म्हणाले, “माझी प्राथमिकता होईल तालुक्याच्या सर्वांगीण विकासात योगदान देणे, जेणेकरून तालुक्यातील गावांची म्हणजेच माझ्या माणसांची प्रगती होईल.” त्यांच्या या वचनाबद्दल स्थानिक जनतेमध्ये सकारात्मक भावना आहे आणि त्यांच्या विजयाच्या अपेक्षाही मोठ्या प्रमाणात आहेत.असे काग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गजेंद्र पाटील यांनी सांगितले.

