महाविकास आघाडीच्या निमित्ताने डॉक्टर अनिल शिंदे योग्य उमेदवार  किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रा. सुभाष पाटील
1 min read

महाविकास आघाडीच्या निमित्ताने डॉक्टर अनिल शिंदे योग्य उमेदवार किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रा. सुभाष पाटील

Loading

महाविकास आघाडीच्या निमित्ताने डॉक्टर अनिल शिंदे योग्य उमेदवार

किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रा. सुभाष पाटील

जुनी पेन्शनचा प्रश्न महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर तात्काळ सोडवेल-

अमळनेर प्रतिनिधी- वैद्यकीय क्षेत्रातील निष्णांत व अभ्यास व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ अनिल नथू शिंदे यांना पाहिले जाते त्यांनी कोरोना काळातही वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील लोकांची सेवा केली.. आज आपणास त्यांच्या सेवेने काहींना जीवदान दिले.. आज आपल्याला संधी आहे.. त्यांचा भार कमी करण्याची ती पण मतदान रुपी… गेल्या अनेक वर्षापासून महाविकास आघाडीला व काँग्रेसला विधानसभा निवडणूक साठी जागा मिळाली नव्हती.. डॉक्टर शिंदे च्या माध्यमातून ती मिळालेली आहे तरी अमळनेर तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनी व पारोळा तालुक्यातील काही गावातील मतदार बंधू भगिनी यांनी महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अनिल नथु शिंदे यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून विजयी करावे असे आवाहन किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुभाष पाटील यांनी सांगितले..
महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव, बेरोजगारी ,महिलांचे प्रश्न, कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा प्रश्न अशा अनेक समस्या महाविकास आघाडी सोडू शकते.. आजतागायत महाविकास आघाडीने सरकार आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात जुनी पेन्शनचा प्रश्न सोडवण्याचा काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले व उद्धव बाळासाहेब ठाकरे व शरद पवार साहेबांनी सांगितले आहे.. महायुतीचे सरकारने फक्त आश्वासन दिले पण प्रत्यक्षामध्ये पेन्शनचा प्रश्न सोडला नाही त्यामुळे कर्मचारी वर्ग खूपच नाराज आहे. याचे उत्तर विधानसभा निवडणुकीमध्ये देतील यात शंका नाही.. सध्याचे सरकार फक्त विकासाचे मोठे आकडे देते पण प्रत्यक्षात विकास कुठे दिसत नाही असे त्यांनी सांगितले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *