संत गजानन महाराजांची वारी निघाली शेगावला.. अमळनेर शहरात गजानन भक्तांनी केले वारीचे स्वागत
1 min read

संत गजानन महाराजांची वारी निघाली शेगावला.. अमळनेर शहरात गजानन भक्तांनी केले वारीचे स्वागत

Loading

संत गजानन महाराजांची वारी निघाली शेगावला..

अमळनेर प्रतिनिधी- संत गजानन महाराज सेवा संस्था दादासाहेब जी.एम सोनार नगर येथील पुरुष वारी वाजत गाजत शेगांवला निघाली..
सकाळी संत गजानन महाराज मंदिरामध्ये सहा वाजेला आरती करण्यात आली आरती करण्याचा मान वारी प्रमुख तथा गजानन महाराज सेवा संस्था अध्यक्ष प्रा आर.बी पवार, महिला वारी प्रमुख ज्योतीताई पवार यांनी शिक्षक पत्रकार ईश्वर महाजन व सौ ज्योती महाजन यांना दिला..

 

सकाळी मंदिराची सजावट महाराज ज्योतीताई पवार, नितीन भावे, अशोक भावे ,कोकोकोला सर, सेवेकरी रघुनाथ पाटील गजानन भक्तांनी केली..
दादासाहेब जी.एम सुनार नगर येथील गजानन महाराज मंदिरातून पायी वारी 6 नोव्हेंबर वार बुधवार रोजी निघाली तर ती शेगावला 11 नोव्हेंबर 2024 रोजी पोहोचणार आहे. हे पुरुषवारीचे बारावी वर्षे आहे सकाळी चहा, नाश्ता, दुपारचे जेवण,चहा, रात्रीचे जेवण, मुक्कामाची व्यवस्था रस्त्यावरील गावातील गजानन भक्त व सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे असे वारी प्रमुख प्रा. पवार यांनी सांगितले..

 

 

सकाळी वारी निघाली तेव्हा परिसरातील मुंदडा नगर विद्याविहार कॉलनी सुरभी कॉलनी सप्तशृंगी कॉलनी वाडी चौक दगडी दरवाजा पैलाड भागामध्ये महीला व पुरुष बांधव भगिनींनी वाजत गाजत वारीचे स्वागत करत रांगोळी व सडा टाकलेला होता..
दादासाहेब जी एम सोनार नगरीतील गजानन महाराज मंदिरातील या पुरुष परिवार ला सर्व गजानन भक्त बंधू भगिनी बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *