महाविकास आघाडीचे उमेदवार* डॉ. अनिल नथ्थु शिंदे यांचे जोरदार प्रचार दौरा….
1 min read

महाविकास आघाडीचे उमेदवार* डॉ. अनिल नथ्थु शिंदे यांचे जोरदार प्रचार दौरा….

Loading

महाविकास आघाडीचे उमेदवार*
डॉ. अनिल नथ्थु शिंदे यांचे जोरदार प्रचार दौरा….

अमळनेर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल नथ्थु शिंदे यांनी महाविकास आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी नेते ज्येष्ठ युवा नेते व सर्व कार्यकर्ते समर्थकांसोबत आज धार, मालपुर, धानोरा, मारवड, गोवर्धन, बोरगांव, बोहरा, कळमसरे, पाडळसरे, निब, तांदळी, या गावामध्ये अत्यंत प्रभावी प्रचार दौरा काढला. या दौऱ्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर, बेरोजगारीच्या मुद्द्यांवर आणि हमीभावाच्या अभावाबद्दल खुलासा केला.
डॉ. शिंदे यांच्या नेतृत्वात, कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या दयनीय परिस्थितीवर, बेरोजगारीच्या प्रश्नांवर चर्चा केली. या संदर्भात, त्यांनी मतदारांना आवाहन केले की, “चांगल्या मतांनी मला निवडून द्या आणि सेवेची संधी द्या.” हे शब्द जनतेचा उत्साह वाढवण्यात महत्त्वपूर्ण ठरले.
*परिवर्तनाचा संदेश*
“जनता बोले परिवर्तन!” हे वाक्य आता अमळनेर विधानसभा मतदारसंघात एक महत्त्वाचे सूचक ठरले आहे. डॉ. अनिल शिंदे यांच्या नेतृत्वात, सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करणे सुरू केले आहे. मतदारांनी स्पष्टपणे व्यक्त केले की, या मतदारसंघातील परिवर्तन निश्चित आहे. त्यांनी सांगितले, “हाथ बदलेगा हालात,” म्हणजेच लोकशाहीच्या माध्यमातून बदल साधला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *