मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप, समाजकल्याण न्यास,आणि रोटी डे या संस्थांचे उपक्रम व कार्य अभिमानास्पद आणि स्तुत्य आहे. -आ.विश्वनाथ भोईर*
![]()
*मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप, समाजकल्याण न्यास,आणि रोटी डे या संस्थांचे उपक्रम व कार्य अभिमानास्पद आणि स्तुत्य आहे. -आ.विश्वनाथ भोईर*
*समाज कल्याण न्यास व मानव सेवा हीच ईश्वर सेवा ग्रुपच्या माध्यमातून दिव्यांग अंध भगिनींना दिवाळी फराळ,रेशन कीट व साडी वाटप कार्यक्रम संपन्न!*
ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी)
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपच्या माध्यमातून, समाज कल्याण न्यासचे संस्थापक – अध्यक्ष धर्मसेवक डॉ. सोन्या काशिनाथ पाटील,लेडीज एक्स्प्रेस ग्रुप कल्याण, स्वामीनारायण हॉल चे संचालक डॉ.दिनेशभाई ठक्कर, रोटी डे ग्रुपचे प्रमुख नितील चंदेयिया, इच्छामणी महिला भजनी मंडळ कल्याण,व राजस्थान शिंपी समाज कल्याण, यांच्या विशेष सहकार्याने दिव्यांग, अंध ,अपंग, भगिनींना दिवाळी फराळ,रेशन कीट व साडी वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात अपंग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य कल्याण येथील कार्यालयात संपन्न झाला. आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ.मनिलाल शिंपी यांच्या संकल्पनेनुसार दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. यशवंत म्हात्रे, उद्योजक समाजसेवक डॉ रामचंद्र देसले,
पोलीस पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष श्री.सोमनाथ बाळाराम ठाकरे,लेडीज एक्स्प्रेस ग्रुपच्या सौ.मधूबेन ठक्कर,डॉ.स्नेहल बोधे,स्वामीनारायण हॉल चे संचालक डॉ.दिनेशभाई ठक्कर,इच्छामणी महिला भजनी मंडळ अध्यक्ष सौ.संगीता पष्टे, राजस्थान शिंपी समाजाचे सचिव नटवरलाल वर्मा, श्रीमती शिल्पा टाकळकर समाजसेविका कल्याण यांच्या उपस्थितीत दिपावली व भाऊबीज भेट कार्यक्रम शनिवार दिनांक २ नोव्हेंबर २०२४ रोजी हातमजूरी करणारे गरीब गरजू तसेच दिव्यांग,अंध, अपंग, बंधू भगिनिंना साडी व फराळ वाटप
कल्याण पश्चिम येथील श्री साई बाबा मंदिराजवळ लालचौकी येथे करण्यात आले.

सदर कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून कल्याण पश्चिमचे आमदार श्री.विश्वनाथ भोईर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवून उपस्थितांना संबोधित केले.यावेळी त्यांनी ज्या ज्या संस्थांनी भाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला अशा सर्व दानशूर व्यक्तींचे कौतुक करून त्यांचे आभार मानले व सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते दिव्यांग भगिनींना दिवाळी फराळ रेशन कीट आणि साडी वाटप करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर एस पी कमांडर डॉक्टर श्री मनीलाल शिंपी यांनी केले तर आभार प्रदर्शन अपंग सेवा महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री अशोक भोईर यांनी केले. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा, ग्रुप समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य,लेडीज एक्स्प्रेस ग्रुप,डॉ.स्नेहल बोधे, कल्याण, स्वामीनारायण हॉल चे संचालक डॉ.दिनेशभाई ठक्कर,इच्छामणी महिला भजनी मंडळ कल्याण,व राजस्थान शिंपी समाजाचे सचिव नटवरजी वर्मा, या संस्थांचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच साहित्य व्यवस्थित आणण्याची महत्वपूर्ण भूमिका भिवंडी शहापूर प्रमुख आर एस पी अधिकारी समादेशक श्री.मंगेश भामरे व ठाणे जिल्हा अतिरिक्त समादेशक जितेंद्र सोनवणे यांनी निभावली. आर एस पी ठाणे पालघर, आणि नाशिक विभागाचे कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांनी सर्व दात्यांचे आभार मानत सर्वांना दिवाळीचा हार्दिक शुभेच्छा दिल्या.

