एरंडोल येथे महात्मा बळीराजाची सुवाद्य मिरवणुक !..  महात्मा बळीराजा समृद्ध परंपरेचा वारसदार – देविदास महाजन.  स्वातंत्र – समता – न्याय – बंधुता प्रस्थापित करणारा राजा – शिवदास महाजन.
1 min read

एरंडोल येथे महात्मा बळीराजाची सुवाद्य मिरवणुक !.. महात्मा बळीराजा समृद्ध परंपरेचा वारसदार – देविदास महाजन. स्वातंत्र – समता – न्याय – बंधुता प्रस्थापित करणारा राजा – शिवदास महाजन.

Loading

एरंडोल येथे महात्मा बळीराजाची सुवाद्य मिरवणुक !..

महात्मा बळीराजा समृद्ध परंपरेचा वारसदार – देविदास महाजन.

स्वातंत्र – समता – न्याय – बंधुता प्रस्थापित करणारा राजा – शिवदास महाजन.

प्रतिनिधी –

एरंडोल – शहरात बळी पाडव्यानिमित्त लोककल्याणकारी राजा महात्मा बळीराजा, राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांची बैलगाडीवर वाचत- गाजत मिरवणूक बळीराजा उत्सव समिती व सत्यशोधक समाज संघ यांच्या वतीने काढण्यात आली. बलिप्रतिपदा म्हणजे बळीराजाचे स्मरण करण्याचा सण भारतीय संस्कृतीत बळीराजा न्यायी, दानशूर,सद्गुणी म्हणून विख्यात आहे. बळीचे राज्य अर्थात समतेचे,न्यायाचे राज्य. बळीचे राज्य म्हणजे स्त्रीपुरुष विषमता, जातीभेद, वर्णभेद रहित राज्य. अशा महादानशूर, संविभागी बळीराजाची आठवण दिवाळीला- बलिप्रतिपदेला बळीराजाचे वारस, शेतकरी आयाबहिणी ” इडा पीडा जावो – बळीचे राज्य येवो ” असे म्हणत करत असतात.
शोभायात्रेत मिरणूक महात्मा जोतिराव फुले स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, मारवाडी गल्ली, अंमळनेर दरवाजा, नागोबा मढी,डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे शोभा यात्रेचा समारोप करण्यात आला. शहरातील सर्व स्मारकांना अभिवादन करून माल्यार्पण करण्यात आले. या शोभायात्रेला शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, ओबीसी, दलित, आदिवासी, भटके, अल्पसंख्याक व शेतकरी बांधवांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून समाजभूषण देविदास महाजन, विजय आण्णा महाजन, दशरथ भाऊ महाजन, पत्रकार बांधव उपस्थित होते.
याप्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे विधीकर्ते शिवदास महाजन, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद महाजन, सचिव कविराज पाटील, तालुकाध्यक्ष हिलाल महाजन, खुशाल महाजन, अनिल महाजन, हिम्मत महाजन, सचिन महाजन, मनोज महाजन, हेमंत महाजन, कमलेश महाजन, समाधान महाजन, विश्वनाथ महाजन,दीपक महाजन, दिनेश महाजन, रघुनाथ महाजन, राजेंद्र महाजन मोहन महाजन, सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र व सत्यशोधक समाज संघ एरंडोल चे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *