कर्तृत्व गौरव पुरस्कार २०२४- **अमळनेरला युवा उदयोजक विजय पाटलाची स्वादिष्ट नमकीन व्यवसायाची भरारी**
![]()
कर्तृत्व गौरव पुरस्कार २०२४-
**अमळनेरला युवा उदयोजक विजय पाटलाची स्वादिष्ट नमकीन व्यवसायाची भरारी**
जिद्द, आत्मविश्वास आणि मेहनत यामुळे माणसाला आपल्या जीवनात यश मिळवता येऊ शकते. अमळनेर तालुक्यातील विजय पाटील आणि निलेश पाटील या युवा उदयोजकांनी “स्वादिष्ट” ग्रुपची स्थापना करून हे सिद्ध केले आहे, आणि हे सर्व त्यांनी वडील आप्पासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे.
विजय पाटील, मार्केटिंग क्षेत्रातील उत्कृष्ट अनुभव असलेल्या, आणि त्यांच्या मित्र व बंधू निलेश पाटील यांच्यासोबत मिळून स्वादिष्ट नमकीन या ब्रँडची निर्मिती केली आहे. सुरुवातीला, हा ब्रँड फक्त अमळनेरतील लोकांपर्यंत मर्यादित होता, पण आता तो संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच पर राज्यांमधील ग्राहकांच्या पसंतीचा ठरला आहे.

युवक उद्योजकता यशस्वी होण्यासाठी व्यक्तीमध्ये सातत्य, संयम, विश्वासार्हता आणि प्रामाणिकता असणे आवश्यक आहे. विजय व निलेश यांनी आपल्या वडिलांपासून मार्गदर्शन घेत स्वादिष्ट नमकीनची सुरुवात केली आणि आज या व्यवसायामुळे 80 लोकांना रोजगार प्रदान केला आहे. काम करणारे सर्व बंधू व भगिनी स्वादिष्टचा एक परिवार झाला आहे..त्यांचा उत्पादित नमकीन अमळनेर, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोहोचला आहे. भविष्यात नवीन उत्पादन विकसित करण्याचा ठरावही त्यांनी केला आहे.
विजय पाटील आणि निलेश पाटील यांचे शिक्षण जीएस हायस्कूलमध्ये झाले. त्यांच्या घराची आर्थिक परिस्थिती थोडी बेताची असली तरी, त्यांनी सात वर्षे मार्केटिंग क्षेत्रात कार्य केले आणि त्यानंतर नमकीन व्यवसायात करिअर करण्याचा निर्णय घेतला. प्रारंभिक काळात, विजूभाऊ आणि निलेशभाऊ दहा किलो बेसन पिठापासून फरसाण तयार करायचे आणि विजूभाऊ तो सायकलने अमळनेरच्या बाजारपेठेत विकत असत. त्यांनी उद्योगातील गुणवत्तेशी कधीच तडजोड केली नाही, आणि “स्वादिष्ट नमकीन” या नावाने त्यांनी पॅकिंग सुरू केली.
ते स्वतःच फरसाण अमळनेरच्या दुकानांमध्ये पोचवत होते, ज्यामुळे त्यांनी उत्पादक क्षेत्रात गुणवत्ता राखून ग्राहकांचा विश्वास जिंकला. त्यामुळे, स्वादिष्ट नमकीन उत्तर महाराष्ट्रात प्रसार झाला. उद्योजक क्षेत्रात त्यांनी जी भरारी मारली आहे, तरीही आर्थिक यश ते कधीच डोक्यावर जाऊ दिले नाही. त्यांच्या कुटुंबाचे सर्वांशी प्रेमणे वागणे हे त्यांच्या या यशाचे मुख्य कारण आहे.
उद्योग व्यवसाय करत असताना सामाजिक बांधीलकी त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. दीपावलीच्या काळात गरजू व आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना फराळ वाटप करणे, तसेच सामाजिक संस्थांना आर्थिक योगदान देणे यामध्ये स्वादिष्ट कुटुंब सदैव पुढे असते.
स्वादिष्ट नमकीनचे मालक विजय पाटील यांची उद्योजकतेतील यशगाथा साजरी करण्यासाठी त्यांना मराठी लाईव्ह न्युजच्या पाचव्या वर्धापनदिनाला
“सत्कार कर्तुत्ववाचा” कार्यक्रमात सन्मानित करण्यात येत आहे, जो निश्चितपणे त्यांच्या मेहनतीचे स्मरण करून देणारा आहे.


