महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांनी बद्रीनाथाचे दर्शन घेत प्रचाराला केली सुरुवात,महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याने ग्रामीण भागात मिळतोय चांगला प्रतिसाद…
1 min read

महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांनी बद्रीनाथाचे दर्शन घेत प्रचाराला केली सुरुवात,महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याने ग्रामीण भागात मिळतोय चांगला प्रतिसाद…

Loading

महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांनी बद्रीनाथाचे दर्शन घेत प्रचाराला केली सुरुवात..

महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याने ग्रामीण भागात मिळतोय चांगला प्रतिसाद…

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर विधानसभा मतदारसंघ
आज महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अनिल नथ्थु शिंदे यांनी बहादरपूर येथील श्री. बद्रीनारायण महाराज चे दर्शन घेऊन प्रसाराला शुभारंभ केला…..
अमळनेर विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ अनिल नथ्थू शिंदे यांचा प्रचाराचा दौरा आज पारोळा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये मतदारांशी हितगुज करत संवाद साधून करण्यात आला..

 

सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही, कर्मचाऱ्यांच्या समस्या अशा विविध विषयांवर डॉ अनिल शिंदे यांनी चर्चा केल्या. व त्यांनी सांगितले की महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात सत्तेत आल्यानंतर सर्वसामान्यांचे सरकार राहील.. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळेल.. कोणावरही अन्याय होणार नाही असे सांगत अमळनेर विधानसभा मतदारसंघात मला चांगल्या मतांनी निवडून द्यावे व सेवेची संधी द्यावी असे महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांनी सांगितले..

 

अमळनेर विधानसभा मतदारसंघातील
बहादरपूर, शिरसोदे, महाळपूर, शेवगे, पुनगाव, बोदर्डे या गावी आज महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अनिल नथ्थु शिंदे यांनी सहकाऱ्यांसोबत प्रचार केला सोबत महेश पाटील, जुबेर पठान , अज़हर सय्यद,गिरीश पाटील, दिनेश पवार, आशीष शिंदे,अँड ललिताताई पाटील, चंद्रशेखर भावसार, पराग पाटील,डॉ बी एस पाटील, तिलोत्तमाताई पाटील, उमेश पाटील, रीता बाविस्कर,सुरेश पीरन पाटिल, धनकर आन्ना पाटील, प्रा सुभाष जिभाऊ पाटील, नीलकंठ तात्या पाटील, प्रताप आबा पाटील,प्रा श्याम पवार, अरुण शिंदे सर,डॉ दिपालीताई शिंदे, डॉ मयुरीताई जोशी, उदय यशवंत पाटील, डॉ सिद्धार्थ पाटील,बालासाहेब पाटील, विजू मास्तर चौबारी, मयूर पाटील कविता पवार,
रोहन मोरे,डॉ प्रविण पाटीलसह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व सर्व ज्येष्ठ नेते युवा मंडळी देखील उपस्थित होते…..

अमळनेर विधानसभा मतदारसंघ परिवर्तन निश्चित आहे जनता बोले परिवर्तन…..
*हाथ बदलेगा हालात..✋*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *