*कर्तृत्व गौरव पुरस्कार 2024 -, मा. सुनील प्रभाकर वाघ** , **शिक्षक, जी.एस. हायस्कूल, अमळनेर** , **क्षेत्र – क्रीडा**
![]()
**कर्तृत्व गौरव पुरस्कार 2024 –
*मा. सुनील प्रभाकर वाघ**
**शिक्षक, जी.एस. हायस्कूल, अमळनेर**
**क्षेत्र – क्रीडा**
सुनील प्रभाकर वाघ हे मुळगाव, धुळे येथील क्रीडाशिक्षक आहेत, ज्यांनी 2009 मध्ये जी.एस. हायस्कूल अमळनेरमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यांनी एम.ए. आणि एम.पी.एड. शिक्षण घेतल्यानंतर डीसीएम कोर्सदेखील पूर्ण केला. त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात क्रीडा विषयाबद्दल विशेष आवड होती आणि त्यांनी या क्षेत्रात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले.
त्यांचे करिअर सुरू करण्यापूर्वी, त्यांनी शिरपूर आर.सी. पटेल मिलिटरी स्कूलमध्ये 8 ते 9 वर्षे सेवा केली, जिथे त्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळाडूंची निवड करणे आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणे यामध्ये महत्त्वाचा वाटा उचलला.
यानंतर त्यांनी अमळनेर येथील जी.एस. हायस्कूल मध्ये क्रीडा शिक्षक म्हणून काम सुरु केले, जिथे संस्थेचे प्रमुख आणि व्यवस्थापनाने पुढाकार घेऊन शाळेत खेळाच्या सकारात्मक वातावरणाचे निर्माण केले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे, अमळनेर तालुक्यात क्रीडा संघटनेच्या तालुकाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली.

जी.एस. हायस्कूलमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनावर जोर देऊन 22 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड केली आहे, तसेच 400 खेळाडूंची राज्यस्तरावर निवड होण्यात मदत केली आहे. त्यांचे मोफत मार्गदर्शन विद्यार्थ्यांना संध्याकाळी सहा वाजेपासून साडेआठ वाजेपर्यंत उपलब्ध आहे.
एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी धुळे येथे क्युमाईन क्लबमध्ये खो-खो आणि कबड्डी खेळांच्या मार्गदर्शनात 40 खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर पोहोचवले.
त्यांची एकच महत्त्वाकांक्षा आहे की, विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत करून भारतात खो-खो व इतर खेळांमध्ये गुणवंत बनावे आणि वीर अभिमन्यू पुरस्काराने सन्मानित व्हावे . त्यांच्या कामामुळे शाळेत खेळाच्या क्षेत्रात एक उत्कृष्ट वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यार्थ्यांना पोलिस व आर्मीच्या विद्यार्थ्यांच्या चाचणीपूर्व परीक्षांचं मार्गदर्शन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे.सुनील वाघ यांना
यांच्या कार्याबद्दल विचारले असता, त्यांनी आपल्या मार्गदर्शक म्हणून भारताचे कर्णधार नरेंद्र शहा, माधवराव पाटील, आणि डॉ. दिनेश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले असल्याचे सांगितले.
आजपर्यंत, त्यांनी 28 विविध पुरस्कार प्राप्त केले असून, त्यात शासनाचे 3 पुरस्कार समाविष्ट आहेत. त्यांची मनीषा आहे की, तालुक्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी सुवर्णपदक आणावे आणि गुणवंत खेळाडू म्हणून आपले स्थान मिळवावे.
त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा सन्मान व्हावा म्हणून, मराठी लाईव्ह न्युजच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना क्रीडा क्षेत्रातील मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.
सुनील वाघ सरांना हृदयपूर्वक अभिनंदन! व शुभेच्छा!


