महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची पुनर्चना
![]()
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची पुनर्चना
15 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची पुनर्चना करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष म्हणून डाॅ सदानंद मोरे यांची नेमणूक करण्यात आली असून, या 24 सदस्यांच्या पॅनेलमध्ये खान्देशातून एकमेव सदस्य म्हणून प्रा. डाॅ. आशुतोष पाटील यांची निवड झाली आहे. ते मुळात अजिवन अध्ययन व विस्तार विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे संचालक आहेत.
प्रा. डाॅ. पाटील हे मराठी साहित्य क्षेत्रातील मान्यवर समीक्षक म्हणून ओळखले जातात. तसेच, “कविता-रती” या वाड्मयीन कवितेला वाहीललेल्या द्वैमासिकेचे ते साक्षेपी संपादक आहेत. त्यांनी साहित्य क्षेत्रात केलेल्या योगदानामुळे त्यांना या समितीत स्थान मिळवण्यात आले आहे.
शशिकांत हिंगोणेकर, साहित्यिक आणि संशोधक विद्यार्थी – क.ब.चौ.उ.म.वि., जळगाव, यांनी प्रा. डाॅ. पाटील यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
**हार्दिक अभिनंदन!**
प्रा. डाॅ. आशुतोष पाटील यांची सन्माननीय निवड ही त्यांच्या कार्याची, ज्ञानाची आणि साहित्यिक प्रवृत्तीची मान्यता आहे. त्यांच्या पुढील कार्याबद्दल शुभेच्छा!
(मराठी लाईव्ह न्युज महाराष्ट्र राज्य)

