महात्मा गांधी विद्यालय सामनेर ता. पाचोरा येथील पुष्पराज वाघ दहा मीटर एअर पेस्टल मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र…..
1 min read

महात्मा गांधी विद्यालय सामनेर ता. पाचोरा येथील पुष्पराज वाघ दहा मीटर एअर पेस्टल मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र…..

Loading

महात्मा गांधी विद्यालय सामनेर ता. पाचोरा येथील पुष्पराज वाघ दहा मीटर एअर पेस्टल मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र…..

जळगाव,( प्रतिनिधी)— महात्मा गांधी विद्यालय सामनेर ता. पाचोरा येथील इ. 10 चा विद्यार्थी पुष्पराज नारायण वाघ या विद्यार्थ्याने 18 ऑक्टोबर 2023 रोजी नाशिक येथे झालेल्या शालेय विभाग स्तरीय स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्टल मध्ये उत्कृष्ट खेळ दाखवत तृतीय क्रमांक मिळवला आणि छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला. पुष्पराज नारायण वाघ हा 2021-22 व 2022-23 शालेय स्पर्धेत राज्यस्तरावर स्पर्धा खेळलेला आहे. 2022 23 ला जी.वी. मावलणकर ऑल इंडिया स्पर्धेत 2 गोल्ड मेडल व तिरुअनंतपुरम येथे झालेल्या इंटर डायरेक्टर शूटिंग कॉम्पिटिशन मध्ये सिल्वर मेडल मिळवले आहेत. छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.आर.भोसले, श्री ए.एन.चौधरी, वाय.के.वंजारी , जी.एस.देशमुख प्रमोद जाधव शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुष्पराज याला राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये उज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या असून पुष्पराज हा जळगाव जिल्हा शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघ यांचा सुपुत्र असून त्याच्या या यशाबद्दल त्याचे सामाजिक, शैक्षणिक ,सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *