कृषीभूषण साहेबराव पाटील उदया विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन
1 min read

कृषीभूषण साहेबराव पाटील उदया विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन

Loading

कृषीभूषण साहेबराव पाटील उदया विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत
कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
कृषीभूषण माजी आमदार साहेबराव धोंडू पाटील विधानसभा निवडणूक 2024 निवडणूक शरदचंद्र पवार गटाच्या तुतारी पक्षाच्या चिन्हावर लढवण्याची पूर्वतयारी मध्ये आहेत.. अमळनेर तालुक्यामध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.. अमळनेर तालुक्यामध्ये त्यांनी केलेली काम ही त्यांची आयडेंटी आहे.. त्यामुळे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे..
तालुक्यातील सध्या तरी वेगवेगळ्या बातम्यांमध्ये लोकांमध्ये द्विधा असल्याने ती दूर करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तर्फे अमळनेर विधानसभा मतदारसंघातून कृषीभूषण साहेबराव पाटील उमेदवार म्हणून उभे राहू इच्छित आहेत.. त्यासाठी संवाद व समर्थनासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.. 22 ऑक्टोबर 2024 सकाळी साडेनऊ वाजता अंबीका मंगल कार्यालय गलवाडे रोड अंमळनेर येथे माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील समर्थक कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मा.आमदार साहेबराव पाटील यांनी केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *