आदित्य ताकमारे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत प्रथम.
1 min read

आदित्य ताकमारे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत प्रथम.

Loading

आदित्य ताकमारे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत प्रथम.

अमळनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील निंभोरा येथील डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी शिक्षण संस्था अमळनेर नानासाहेब उत्तमराव पाटील प्राथमिक आश्रम शाळा इ ६ वी चा विद्यार्थी चि.आदित्य तानाजी ताकमारे हा राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत जिल्हा क्रीडा संकुल परभणी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजयी होऊन सुवर्ण पदक पटकावले आहे. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ३५ किलो वयोगटात प्रथम क्रमांकाने यश मिळवून नॅशनल स्पर्धे साठी त्याची निवड झाली आहे.
नॅशनल पातळीवर होणाऱ्या स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली असुन त्याला संस्थेचे मुख्याध्यापक प्रदीप शांताराम सोनवणे सोबत शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मागर्दशन व सहकार्य लाभले.मुख्याध्यापक प्रदीप शांताराम सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडी बद्दल त्याचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,
सचिव सर्व संस्थाचालक,
मुख्याध्यापक.श्री.
प्रदीप शांताराम सोनवणे सोबत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद ,मित्रपरिवार, गुरुजन वर्ग यांचे मागर्दशन लाभले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *