महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगारातील वाहक व चालक यांचा सत्कार .
![]()
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगारातील वाहक व चालक यांचा सत्कार .
अमळनेर प्रतिनिधी
नाही म्हटलं तरी आज देखील लाल परी सर्व सामान्य लोकांची जीवन वाहिनी आहे.रोज हजारोंच्या संख्येने अबालवृद्ध तीच्या ने आपल्या इच्छित स्थळी प्रवास करतात. अशात अमळनेर आगाराचा विचार करता वाढलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात बसेस कमी व ज्या आहेत त्याही फार काही सुस्थितीत नाहीत.फेरऱ्या वाढलेल्या. अशात प्रवासी व चालक आणि वाहक यांचा संघर्ष होणं हे परिस्थिती संगतच.पण, याही विषम परिस्थितीत सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी जर डोक्यावर बर्फ व तोंडात साखर ठेवत आपल्या कर्तव्याला सेवेची जोड दिली तर नक्कीच परिस्थिती बदलू शकते. नोकरवर्ग आणि सामान्य माणसातील संघर्ष टाळला जाऊन ऋणानुबंध वृद्धिंगत होऊ शकतात ही गोष्ट नक्की याची प्रचिती आली ती येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगारातील वाहक श्री.विजय शालिग्राम बहिरम ( पाटील ) व चालक श्री.व्ही.एम.धनगर यांचा प्रवासीभिमुक उत्कृष्ट सेवेबद्दल शिरपूर ते अमळनेर नेहमी अप डाऊन करणारऱ्या ॲड.इंजि.सुरज गजभिये (प्रणाली अधिकारी, जिल्हा सत्र न्यायालय, अमळनेर) व मित्र परिवार तर्फे आगार व्यवस्थापक कार्यालयात भेट वस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी श्री.अनिकेत न्याहळदे ( वाहतूक निरीक्षक ), श्री.प्रमोद बाविस्कर, श्री.अमोल बहिरम ( लिपीक ), श्री .दिपक पवार, सर व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

