प्रा डॉ ईश्वर पाटील यांची बोर्ड सदस्य म्हणून नियुक्ती*
1 min read

प्रा डॉ ईश्वर पाटील यांची बोर्ड सदस्य म्हणून नियुक्ती*

Loading

*डॉ. ईश्वर पाटील यांची बोर्ड सदस्य म्हणून नियुक्ती*

पारोळा: राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयातील महाराष्ट्र शासन आदर्श पुरस्कार प्राप्त तथा नवीन शैक्षणिक धोरण 2020 राज्य अभ्यासक्रम आराखडा समिती सदस्य डॉ. ईश्वर शेकनाथ पाटील यांची महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील नाशिक विभागात कार्यकारी समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नामनिर्देशनाने नियुक्ती करण्यात आली. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. काकसो वसंतराव मोरे, प्रशासकीय अधिकारी दादासो रोहन मोरे, संचालक दादासो पराग मोरे, प्राचार्य बापूसो डॉ. व्ही. आर. पाटील, उपप्राचार्य डॉ. वंदना पाटील, प्रा. पी. पी. पाटील तसेच सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी, प्रशासकीय कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तसेच सर्वच स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे.

कँप्शन
डॉ. ईश्वर पाटील यांचा सत्कार करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, उपप्राचार्य डॉ. वंदना पाटील, कार्यालयीन अधिक्षक संजय मोरे, डॉ. डी. आर. पाटील, प्रा. पी. पी. पाटील, प्रा. ए. ए. मोरे, श्री. पी. एस. पाटील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *