राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्य उपाध्यक्षपदी अंबादास बनकर यांचे नियुक्ती,मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नियुक्त पत्र प्रदान
1 min read

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्य उपाध्यक्षपदी अंबादास बनकर यांचे नियुक्ती,मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नियुक्त पत्र प्रदान

Loading

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्य उपाध्यक्षपदी अंबादास बनकर यांचे नियुक्ती,मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नियुक्त पत्र प्रदान

नाशिक,दि.१३ ऑक्टोबर :-ज्येष्ठ सहकार नेते मंत्री छगन भुजबळ यांचे विश्वासू सहकारी अंबादास बनकर यांची आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आज मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला संपर्क कार्यालयात अंबादास बनकर यांना नियुक्तीपत्रक प्रदान करण्यात आले. त्यांच्या या निवडीबद्दल विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, ज्येष्ठ नेते विश्वास बापू आहेर, अरुण थोरात, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, ज्येष्ठ नेते एल.जी.कदम, जलचिंतन सेलचे अध्यक्ष मोहन शेलार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, भाऊसाहेब भवर, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, शहराध्यक्ष दिपक लोणारी, दत्ता निकम, डॉ.श्रीकांत आवारे, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, मच्छिंद्र थोरात, शिवाजी सुपनर, दत्तात्रय डुकरे, बाळासाहेब पुंड, दत्तात्रय रायते,साहेबराव आहेर, गणपत कांदळकर, राजेश भांडगे, सचिन कळमकर, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, भाऊसाहेब बोचरे, विनोद जोशी, गोरख शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देत. आगामी निवडणुकीत येवला मतदारसंघाची महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *