डी एन ठाकरे कनिष्ठ महाविद्यालयाचा क्रिकेट संघाची तालुकास्तरीय स्पर्धेत यशस्वी घोडदौड,डॉ.मनिलाल शिंपी हे महाविद्यालयाच्या क्रिकेट संघाच्या विजयाचे खरे शिल्पकार -करसन ठाकरे.
1 min read

डी एन ठाकरे कनिष्ठ महाविद्यालयाचा क्रिकेट संघाची तालुकास्तरीय स्पर्धेत यशस्वी घोडदौड,डॉ.मनिलाल शिंपी हे महाविद्यालयाच्या क्रिकेट संघाच्या विजयाचे खरे शिल्पकार -करसन ठाकरे.

Loading

डी एन ठाकरे कनिष्ठ महाविद्यालयाचा क्रिकेट संघाची तालुकास्तरीय स्पर्धेत यशस्वी घोडदौड.
डॉ.मनिलाल शिंपी हे महाविद्यालयाच्या क्रिकेट संघाच्या विजयाचे खरे शिल्पकार आहेत.: करसन ठाकरे.

ठाणे,कल्याण:( मनिलाल शिंपी) क्रीडा व युवक सेवा संचनालाय महाराष्ट्र राज्य,जिल्हा क्रिडा अधिकारी ठाणे आणि ठाणे जिल्हा ग्रामीण भिवंडी तालुका आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेचे ऑल सेंट इंटरनॅशनल स्कूल भवाळेगाव, तालुका भिवंडी येथे,ज्येष्ठ क्रीडा संघटक प्रा.गुणवंत बेलकडे यांचा नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले होते. डी.एन.ठाकरे कनिष्ठ महाविद्यालय रांजनोलीचा अंडर १९ क्रिकेट संघाने भिवंडी तालुका संघाचा मान मिळवत ठाणे जिल्हा क्रिकेट स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे.धानकुबाई ठाकरे सामाजिक व सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष श्री करसन ठाकरे यांनी विजय खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करताना सांगितले की आमच्या संस्थेच्या महाविद्यालयाचा हा पहिलाच विजय आहे व या विजयाचे खरे शिल्पकार आमच्या महाविद्यालयाचे स्पोर्ट्स डायरेक्टर डॉक्टर मनिलाल शिंपी हे आहेत. पहिल्याच प्रयत्नात १९ वर्षाखालील क्रिकेट खेळाडूंनी जिल्हा पातळीवर प्रवेश मिळवला आहे त्याबद्दल कॉलेजचे प्राचार्य सचिन ठाकरे व प्राचार्य गोरक्षनाथ तरे यांनी फिजिकल डायरेक्टर डॉ.मनिलाल शिंपी यांचासह सर्व खेळाडूंचे अभिनंदन आणि कौतुक केले. प्रा.कसबे, प्रा.देविदास कांबळे,प्रा.विशाल सोनवणे, प्रा.हर्षल शेटे,प्रा.माधव कांबळे,यांचेही मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे. आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थ्यांना कुठेतरी खेळामध्ये वाव मिळावा व त्यांच्यातले खेळाडू जागृत व्हावेत यासाठी तळमळ करणारे, महाविद्यालयाचे एडमिन रुपेश तरे सर यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *