श्री शिवाजी हायस्कूल येथे पौगंड अवस्थेतील शिक्षण व आरोग्य साक्षरता कार्यशाळा संपन्न.
1 min read

श्री शिवाजी हायस्कूल येथे पौगंड अवस्थेतील शिक्षण व आरोग्य साक्षरता कार्यशाळा संपन्न.

Loading

श्री शिवाजी हायस्कूल येथे पौगंड अवस्थेतील शिक्षण व आरोग्य साक्षरता कार्यशाळा संपन्न.
दि. 7/10/2024 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव,आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि श्री शिवाजी माध्यमिक, उच्च माध्यमिक व किमान कौशल्य विभाग विद्यालय ,हातेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 07/10/24 रोजी *पौगंडाअवस्थेतील शिक्षण व आरोग्य साक्षरता याविषयी कार्यशाळा* आयोजित केली गेली… याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक नृसिंह हॉस्पिटल चोपडा चे संचालक डॉक्टर दीपक पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री महेश पाटील गटविकास अधिकारी प . स.चोपडा, डॉक्टर प्रदीप लासुरकर तालुका वैद्यकीय अधिकारी चोपडा तसेच तालुका ग्रामीण पोलीस निरीक्षक श्रीमती कावेरी कमलाकर यांनी हजेरी लावली..
विद्यार्थ्यांना वरील विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. प्राजक्ता भामरे, भामरे हॉस्पिटल, चोपडा. डॉ. क्षमा पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र हातेड, डॉ. श्री. जितेंद्र राठोड, आरोग्य विभाग धुळे, प्रा. श्री चेतन सोनवणे हे उपस्थित होते. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना पौगंडा अवस्तेतील शाररिक बदल, मानसिक स्वास्थ,होणारे बौद्धिक आणि सामाजिक बदल या संबंधित सुंदर मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष पद माननीय माजी शिक्षक आमदार श्री दिलीपरावजी सोनवणे यांनी भूषविले… कार्यक्रमाचे प्रस्तविक कार्यक्रम समन्वयक प्रा. राजेंद्र एस चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. रमाकांत धनगर यांनी केले
सदर कार्यक्रमास लासुर, हातेड आश्रम शाळा, चहार्डी विद्यालय,घोडेगाव विद्यालय, चुंचाले विद्यालय व हातेड विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी भरभरून सहभाग नोंदविला. कार्यक्रमच्या यशस्वीते साठी मुख्याध्यापक पी सि पाटील,
पर्यवेक्षक पंजाबराव बाविस्कर तसेच शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे आभार. पर्यवेक पंजाबराव बाविस्कर यांनी केले. सदर कार्यक्रमात पंचक्रोशीतील विविध शाळांचे प्राचार्य शिक्षक व विद्यार्थी हजर होते तसेच व्यासपीठावर पंचक्रोशीतील सरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.*कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पीसी पाटील पर्यवेक्षक पी आर बाविस्कर प्राध्यापक राजेंद्र चव्हाण सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *