जळगावमध्ये शिक्षकांचे वेतन लवकर मिळवण्यासाठी जुक्टो संघटनेचा यशस्वी पाठपुरावा,  पदवीधर आमदार  सत्यजित तांबे व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग, तांत्रिक अडचणींची यशस्वी सोडवणुक
1 min read

जळगावमध्ये शिक्षकांचे वेतन लवकर मिळवण्यासाठी जुक्टो संघटनेचा यशस्वी पाठपुरावा, पदवीधर आमदार सत्यजित तांबे व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग, तांत्रिक अडचणींची यशस्वी सोडवणुक

Loading

जुक्टो संघटनेच्या प्रयत्नांना यश.

जळगाव: जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या माहे सप्टेंबरच्या वेतनासाठी ई-कुबेर प्रणालीत आलेल्या तांत्रिक अडचणीच्या सोडवणुकीसाठी आदरणीय आ.सत्यजित तांबे (नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ) यांनी महाआयटीचे श्री.घोलप साहेब यांचेशी संपर्क साधून यशस्वी प्रयत्न केले.यासंदर्भात मा.राजेंद्र खैरनार साहेब (जिल्हा कोषागार अधिकारी),श्री.गुंजाळ साहेब (अप्पर कोषागार अधिकारी) मा.श्री. राजमोहनजी शर्मा (अधिक्षक वेतन पथक कार्यालय) साहेब यांनी अथक परिश्रम घेत समस्या निकाली काढली. या सर्व कार्यासाठी प्रा.नंदन वळींकार (जिल्हाध्यक्ष) प्रा.सुनील सोनार (सचिव), प्रा.सुनील गरुड, प्रा. डी.डी. पाटील (जेष्ठ मार्गदर्शक), प्रा.गजानन वंजारी, डॉ. अतुल इंगळे,प्रा.राजेंद्र तायडे, प्रा.पी.पी.पाटील, प्रा.शरद पाटील, प्रा.राजेश भटनागर (उपाध्यक्ष), प्रा.शैलेश राणे,प्रा.सुनील पाटील (कार्याध्यक्ष) यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *