कल्याण येथे जिल्हास्तरीय आर्चरी स्पर्धा उत्साहात संपन्न.  आर्चरी प्रशिक्षण भारतीय प्राचीनकालीन संस्कृती पासून सैन्यदलासाठी महत्वाचे आहे : महादेव क्षिरसागर
1 min read

कल्याण येथे जिल्हास्तरीय आर्चरी स्पर्धा उत्साहात संपन्न. आर्चरी प्रशिक्षण भारतीय प्राचीनकालीन संस्कृती पासून सैन्यदलासाठी महत्वाचे आहे : महादेव क्षिरसागर

Loading

कल्याण येथे जिल्हास्तरीय आर्चरी स्पर्धा उत्साहात संपन्न.

आर्चरी प्रशिक्षण भारतीय प्राचीनकालीन संस्कृती पासून सैन्यदलासाठी महत्वाचे आहे : महादेव क्षिरसागर

ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी)
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग अंतर्गत जिल्हास्तरीय अंतर शालेय आर्चरी स्पर्धेचे कल्याण सिटी पार्क येथे
नोडल ऑफिसर क्रीडा ऊपायुक्त,सौ.स्नेहा कर्पे मॅडम,क्रीडा पर्यवेक्षक श्री.प्रविण कांबळे, क्रीडा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष अंकुर आहेर,खेळ प्रमुख मुख्याध्यापक महादेव क्षिरसागर यांचा उपस्थित आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नोडल अधिकारी सौ स्नेहा करपे यांनी सांगितले की, कल्याण महानगरपालिका क्रीडा विभागाच्या माध्यमातून विभागांमध्ये प्रथमच कबड्डी स्पर्धा मॅटवर खेळवल्या गेल्या याचे सर्व श्रेय ज्येष्ठ आणि उत्कृष्ट क्रीडा संघटक मुख्याध्यापक महादेव क्षीरसागर यांना आहे कारण अतिवृष्टीमुळे कबड्डी स्पर्धा घेण्यासाठी कोणतेही मैदान उपलब्ध नव्हते अशा परिस्थितीत क्षीरसागर सर यांनी कबड्डी स्पर्धेसाठी आवश्यक असणाऱ्या मॅट उपलब्ध करून दिल्या व युवा क्रीडा संघटक क्रीडा समिती सदस्य व क्रीडाशिक्षक व खेळाडूंचे हितचिंतक, मार्गदर्शक कृष्णा माळी यांच्या बहुमूल्य योगदानामुळे, व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ क्रीडा संघटक अंकुर आहेर सर, प्रा.विजय सिंग, गजानन वाघ, प्रा. सुभाष पंजे, मुथा कॉलेजचे स्पोर्ट्स डायरेक्टर दिनेश स्थळे, व ज्यांच्यामुळे कबड्डी स्पर्धा यशस्वी झाली असे खेळ प्रमुख सुरज जाधव सर या सर्वांच्या सहकार्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आंतरशालेय क्रीडा स्पर्धा अत्यंत उत्साहात व नियोजनबद्ध पार पडत आहेत त्याबद्दल मी या सर्व गुरुजनांचे धन्यवाद व्यक्त करते असे शेवटी सांगितले.यावेळी सिटी पार्कचे ईंचार्ज श्री.कुशवाह सर,शेट्टी सर,विजय ईंगळे, खेळ प्रमुख श्री.महादेव क्षीरसागर, क्रीडा संघटक कृष्णा माळी,योगेश सावंत,वैभव पवार ,प्रकाश गोपणे सर,शेखर शिंदे,प्रमुख रेफ्री प्रविण क्षीरसागर,भायदे यांनी पंच म्हणून विशेष कर्तव्य करत काटेकोरपणे खेळाडूंना न्याय देण्याचे काम केले. वाणी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक गजानन वाघ ,राजगुरू सर ,जयवंत पाटील,सर्व ठाणे जिल्हाआर्चरी असोसियेशन चे पदाधिकारी, जज्जेस,कोच, खेळाडूंसाठी बिस्किट्स, पाण्याची तसेच अम्बुलस ची सोय करण्यात आली होती.,स्पर्धापंच, आणि उपस्थित क्रीडा शिक्षक यांच्यासाठी चहा,नाश्ता, जेवनाची ऊत्तम सोय करण्यात आली होती. आनंदी आणि उत्साहपूर्ण वार्तावरणात स्पर्धा संपन्न झाल्या.कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्रीडा विभाग नोडल अधिकारी स्नेहा कर्पे मॅडम,क्रीडा पर्यवेक्षक प्रविण कांबळे यांनीही आर्चरी स्पर्धेच्या आनंद घेतला व आर्चरीच्या खेळाडूंनाभावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. स्पर्धा संपल्यानंतर हे प्रमुख तसेच तक्रार निवारण समिती सदस्य मुख्याध्यापक महादेव क्षीरसागर यांनी विजयी खेळाडूंना शुभेच्छा देताना सांगितले की आर्चरी च्या प्रशिक्षणामुळे प्राचीन काळापासून भारतीय सैन्य दलामध्ये विशेष महत्त्व आहे.असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *