साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक डि.के पाटील उपक्रमशिल शिक्षक पुरस्काराने सन्मानित
1 min read

साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक डि.के पाटील उपक्रमशिल शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Loading

साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक डि.के पाटील उपक्रमशिल शिक्षक पुरस्काराने सन्मानित

अमळनेर प्रतिनिधी
नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फॉर्म राज्यस्तरीय डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण आदर्श पुरस्कार विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अविरत प्रयत्न केल्याबद्दल व विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी त्याचप्रमाणे शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक कार्याच्या गौरव म्हणून हा पुरस्कार दिला जातो.

.साने गुरुजी नूतन विद्यालयाचे उपशिक्षक तथा विज्ञान मंडळाचे कार्याध्यक्ष डी के पाटील सर विज्ञान मंडळाच्या माध्यमातून उपक्रम राबवितात त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फॉर्म राज्यस्तरीय डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण उपक्रमशिल शिक्षक पुरस्काराने सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले..
पुरस्कार देतांना नॅशनल डायरेक्टर नैसर्गिक मानव सुरक्षा परिषद श्री गोरख देवरे सर महाराष्ट्र महिला सेल अध्यक्ष, प्राध्यापक मंदाकिनी भामरे ,नंदुरबार जिल्हा अध्यक्ष प्रा डॉ ज्योती आर लष्करी, महाराष्ट्र सचिव ईश्वर पाटील व देवपूर पोलीस स्टेशनचे पीआय पाटील साहेब यांच्या हस्ते त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील पुरस्कारार्थी शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते..
डि.के पाटील यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे ,संचालक मंडळ,व साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील शिक्षक वृंद व मित्रपरिवार यांनी केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *