सुख, समाधान, आनंद या गोष्टी परिस्थितीवर नाही तर मनावर अवलंबून -प्रा. डॉ. संजय कळमकर सुप्रसिद्ध साहित्यिक
1 min read

सुख, समाधान, आनंद या गोष्टी परिस्थितीवर नाही तर मनावर अवलंबून -प्रा. डॉ. संजय कळमकर सुप्रसिद्ध साहित्यिक

Loading

सुख, समाधान, आनंद या गोष्टी परिस्थितीवर नाही तर मनावर अवलंबून
-प्रा. डॉ. संजय कळमकर
सुप्रसिद्ध साहित्यिक

अमळनेर प्रतिनिधी
आनंदी जीवन जगण्यासाठी उत्तम आरोग्य आणि संतुलित मन:स्थिती आवश्यक आहे. त्यासाठी दिनचर्या चांगली पाहिजे. पहाटे फिरायला जाणे, थोडासा प्राणायाम, जमले तर जिमला जातो. विशेष म्हणजे आनंद हा शोधता आला पाहिजे. आपल्याला सर्वच गोष्टीतून आनंद मिळवता येतो. पण त्यासाठी आपलं मन, ह्रदय समुद्रासारखं विशाल असावं लागतं. मोठ्या आनंदाची संधी मिळेल किंवा नाही पण छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आनंद साजरा करून भरपूर आनंद मिळवू शकतो. त्यासाठी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक ठेवला पाहिजे. असे अमळनेरला मराठी वाड्:मय मंडळाच्या वतीने आयोजित शारदीय व्याख्यान मालेत प्रा. डॉ. संजय कळमकर
सुप्रसिद्ध साहित्यिक ‘जगण्यातील आनंदाच्या वाटा’ या विषयावर बोलतांना सांगितले..

 

ते पुढे म्हणाले की कुठल्याही गोष्टीची चिंता, विचार आपल्याला आनंदापासून परावृत्त करत असतात. त्यामुळे जीवनाचा निखळ आनंद आपण उपभोगू शकत नाही. म्हणून जीवनात सकारात्मक मित्रांची निवड केली पाहिजे. चांगल्या सवयी लावल्या पाहिजे. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवला पाहिजे. कुणाशीही शत्रुत्व, वैर घेऊ नये व कोणाविषयी आकस ही धरू नये.
ज्यामुळे आपले आयुष्य कठीण बनते, ज्या गोष्टीचा आपल्या मनाला त्रास होतो ती न केलेलीच बरी कारण त्यामुळे आपल्या जीवनातील आनंद संपत जातो. नेहमी दुसऱ्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार असला पाहिजे. मैत्रीपूर्ण संबंध असले पाहिजे. आपण जसे वागू, जसे बोलू तेच परत आपल्याला मिळते. त्यामुळे नेहमी सर्वांशी गोड बोलने आवश्यक आहे सर्वांशी प्रेमाने वागले पाहिजे.
त्यासाठी आधी आपले कुटुंब आनंदी ठेवावे आपण नकारात्मक राहिलो तर कोणत्याही गोष्टीचा आनंद आपण घेऊ शकत नाही म्हणून लहान- लहान गोष्टींवर लक्ष देऊन त्यांचा मनापासून आनंद घ्या. फार लांबचा विचार करत बसू नका. दररोज प्रसन्न रहा, उत्साही राहण्यासाठी सकाळ, सायंकाळ वेळ मिळेल तेंव्हा व्यायाम करा. आरोग्य ही खरी संपत्ती आहे..
त्यामुळे तिची काळजी घ्यावी व आपल्या तंदुरुस्ती कडे लक्ष द्यावे. स्वतःची तुलना कधीही कुणाशी करू नये कारण त्यामुळे दुःखच वाट्याला येते. सर्व काही चांगले होईल असा विश्वास सतत आपल्या मनात ठेवावा. कितीही दुःख, संकटे आले तरी त्याला हसत- हसत सामोरे गेले पाहिजे. समस्येचे समाधान शोधले पाहिजे.
आजार होण्यापेक्षा त्याची भीती जास्त धोकादायक असते त्यामुळे आपण नकारात्मक राहिलो तर जगातील कुठल्याच गोष्टीचा आनंद आपण घेऊ शकणार नाही. आनंद हा आतून आला पाहिजे. मनाला समाधान मिळते,
जगात कोणता देश आनंदी आहे यात १४८ देशाचा सर्वे झाला.त्यात भारताचा जगात १०८ नंबर आहे.. सामाजिक प्रदूषणामुळे सगळा समाजच अस्वस्थ आहेत याचा विचार आपण केला पाहिजे.
मनोरंजनाचे साधन रेडिओ होते,चुकामध्ये आनंद शोधायचे आता आनंदात चुका शोधतात..मनोरंजनाची साधने बदलली,टिव्ही कृष्ण धवल होता आता आनंद रंगीत झाला आहे. आपले दैनंदिन काम करावे याच्यासाठी तंत्रज्ञान आलं पण आता माणसं दैनंदिन काम पटकन करतात आणि सगळा वेळ तंत्रज्ञानात घालतात..आता अशी परिस्थिती निर्माण झाली हे कमी होतं म्हणून मोबाईल आला मोबाईल हा एक सुंदर आविष्कार आहे… जेवढा चांगला उपयोग आपण मोबाईलचा करू तेवढा आपल्याला चांगला त्याचा उपयोग होऊ शकतो पण माणसं त्या आभासी जगामध्ये इतका गुरफटला की सगळे माणसे आभासी होतात की काय? अशी परिस्थिती रात्रंदिवस माणसं व्हाट्सअप पाहतात.. अगोदर सार्वजनिक काळात नळावरचे जसे भांडण असतात तसे व्हाटसफ ग्रुपमध्ये भांडण सुरू असतात.. एखादी वादग्रस्त पोस्ट आली वाचायची नाही पुढे पाठवून द्यायची पोस्टमनगिरी करायची तू वाच…
नाहीतर एखादी सुंदर कविता आली कविता जर आवडली, कवितेचे नाव काढायचं आमचं पेस्ट करायचं असे कवी सुद्धा निर्माण झाले… फेसबुक सगळ्यांचे आहे तर फेसबुक वर आपला चेहरा चांगला नसेल तर दुसऱ्याचा सुंदर चेहरा त्यावर टाकला जाऊ लागला कारण त्यासाठी फ्रेंड रिक्वेस्ट जास्त येतात त्यासाठी ही गंमत केली जाऊ लागली व
इंस्टाग्राम आवडतं व्हर्जन… इंस्टाग्राम म्हणजे पालक नसलेला वधू वर सूचक केद्र.. मंडळाला पालकांची गरज नाही मग कुठल्यातरी राज्यामध्ये ज्या मुलांचे लग्न होत नाही ज्यांना मुली मिळत नाही ते मुलं आपल्या महाराष्ट्रातल्या मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवता तो खोट्या गोष्टी लिहितात.. असा खोटा फोटो टाकतात की मी अमुक आहे.. हॉस्पिटलात मोठा डॉक्टर आहे.. आपल्या वडिलांना सोडून त्या मूली पळून जातात आणि त्या राज्यामध्ये गेल्यानंतर त्या तरुणाला भेटल्यानंतर त्यांना समजतं हा डॉक्टर इंजिनियर बागायतदार कोणी नाही हा मवाली आहे. त्या मुली उध्वस्त होतात आणि पुन्हा आपल्या आई-वडिलांकडे येतात.. महाराष्ट्रामध्ये यावर्षी अशा 100 च्या वरती केस झालेल्या आहेत.. त्यामुळे आपल्या पालकांनी आत्मपरीक्षण करावे .
बाहेरचे पाहून पाहून आमच्या तरुणांना आता आमची आई कुरूप वाटायला लागली अशी ही परिस्थिती आहे पण मित्रांनो या जगात सगळ्यात सुंदर कोण असेल तर ती आपली आई आहे..
त्याच्या तरुणांना पटविले पाहिजे .. तुम्ही विचार करा पाचवीला तुमच्या मुलाला जर 70 टक्के असतील, सहावीला 72 असतील, सातवीला 78 असतील, आठवीला 74 असतील याचा अर्थ त्याची बुद्धिमत्ता ही सात ते 70 च्या दरम्यान आहे हे आपण ओळखलं पाहिजे आणि त्याला दहावीला अचानक 90 च्या पुढे कसे मार्क पडतील पण अवास्तव अपेक्षा करण्यात आनंद विसरतो..त्याला त्याच्या क्षमता ओळखू द्यावे..
आता सध्या देशात अगोदर औषध निघतात नंतर आजार निघतात व नावे दिली जातात हे वास्तव आहे…जोपर्यंत समाजात प्रज्ञावंत आहेत तोपर्यंत समाज आहे.. तीन वेळेस नापास झालेले सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले.. आर के लक्ष्मण जगातले एक प्रमुख व्यंगचित्रकार त्यांना जे जे आर्ट्स मध्ये प्रवेश मिळाला नाही.. ते सांगतात मला तिथे प्रवेश मिळाला असता तर मी फक्त पोस्टर रंगवले असते .मला प्रवेश मिळाला नाही म्हणून मी व्यंगचित्रकार झालो ही जगातल्या शाळेने शिकवलेली माणसं आहेत म्हणून पालकांनी आपल्या मुलांना त्याची बुद्धिमत्ता किती आहे हे ओळखून त्या दिशेने त्याला दिशा दिली पाहिजे त्याच्यामध्ये काय क्षमता आहे तो जर चांगला चित्रकार असेल तर त्याला रंग आणून द्या , तो चांगला खेळत असेल तर त्याला बॅट आणून द्या इतर क्षेत्रांमध्ये त्याला घाला परंतु या जबाबदारीच्या क्षेत्रामध्ये पालकांनी घातल्यामुळे काय होतं आमचा अपेक्षाभंग होतो कोट्यामध्ये आम्ही मुलं घालतो त्यांना विचारत नाही पैसा आहे म्हणून आम्ही कोटयाला घालतो मी साऱ्यांनाच म्हणत नाही..पण मुलं आत्महत्या का करतात ? एक
दडपण माझ्या वडिलांनी पैसे भरले आहेत, माझे आईने पैसे भरले आहेत म्हणून तो जातो..सध्याआज सध्या संवेदना हरवल्या आहेत,संस्कार हे कुटुंबात आहे,आनंद दिल्याने वाढतात असे सांगितले..

 

व्यासपीठावर व्याख्याते सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ संजय कळमकर
प्रमुख अतिथी डॉ संदीप जोशी
हृदयरोग तज्ञ, डॉ सौ मयुरी जोशी
स्त्रीरोगतज्ज्ञ, मराठी वाड्:मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी,संदीप घोरपडे उपस्थित होते.
पाहूण्याचा परिचय मंडळाचे सदस्य बन्सीलाल भागवत यांनी केला.यावेळी मराठी वाड्:मय मंडळाचे उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मान्यवरांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या..प्रमुख पाहुणे डॉ संदीप जोशी व डॉ मयुरी जोशी यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या..
व्याख्यान मालीका यशस्वी करण्यासाठी मराठी वाङ्‌मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ
सोमनाथ ब्रह्मे, शरद सोनवणे,
कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारणी
सदस्य प्रा.डॉ.पी.बी.भराटे, बन्सीलाल
भागवत, स्नेहा एकतारे, संदीप
घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब
मगर, प्रा.डॉ.सुरेश माहेश्वरी, प्रा.श्याम
पवार, प्रा.शीला पाटील, स्विकृत
सदस्य अजय केले, बजरंगलाल
अग्रवाल, ग्रंथपाल हेमंत बाळापूरे यांनी
केले आहे.
सुत्रसंचालन मराठी वाड्:मय मंडळाचे सदस्या स्नेहा एकतारे व आभार प्रर्दशन सदस्य बन्सीलाल भागवत यांनी केले.
व्याख्याते डाँ कळमकर यांनी श्रोत्यांना पोट धरून हसवले . व्याख्यानमानेला मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *