आरक्षण बचाव संघर्ष समितीतर्फे दि. ७ सोमवार रोजी धडक मोर्चा
![]()
आरक्षण बचाव संघर्ष समितीतर्फे दि. ७ सोमवार रोजी धडक मोर्चा
जळगाव* – १ ऑगस्ट २०२४ सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती-जमातीचे उपवर्गीकरण आणि क्रिमिलेयरचे तत्त्व करण्याबाबत दिलेल्या निर्णया संदर्भात प्रतिनिधीत्वाच्या संकल्पनेचा तसेच अनुसूचित जाती-जमातीचा शिक्षण घेण्याचा आणि नोकर्यांमधील सर्व समावेशाचा मार्ग बंद होण्याच्या धोक्यासंदर्भात अनेक सरकारी सेवा आणि उद्योगांच्या खाजगिकरणामुळे भारतीय संविधानातील संधीच्या समानतेचे तत्त्वच निष्प्रभ ठरले असले असल्याचे वास्तव परिस्थिती निर्माण झाली असल्या कारणाने हा आरक्षण बचाव धडक मोर्चा आयोजित केला असून दि. ७ ऑक्टोबर २०२४, सकाळी ११ वा. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, रेल्वे स्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव असा आयोजित केला असून संघर्ष समितीतर्फे या जनआंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन आरक्षण बचाव संघर्ष समितीचे मुकुंदभाऊ सपकाळे यांनी केले आहे.

