कल्याण येथे आंतरशालेय जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न.
![]()
कल्याण येथे आंतरशालेय जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न.
ठाणे: कल्याण(मनिलाल शिंपी)कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग अंतर्गत आंतर शालेय जिल्हा स्तरीय बास्केटबॉल स्पर्धा 2024/25
कल्याण पश्चिम येथे वामनराव पै सभागृहात आयोजित करण्यात आल्या होत्या.यावेळी,
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्रीडा विभाग नोडल अधिकारी व उत्कृष्ट खेळाडू स्नेहा करपे यांचा हस्ते जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी क्रीडा व तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष अंकुर आहेर, जेष्ठ क्रीडा संघटक मुख्याध्यापक क्रीडा समिती सदस्य महादेव क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत .
स्पर्धेला प्रारंभ झाला.या स्पर्धेचे उत्कृष्ट असे नियोजन अग्रवाल कॉलेज चे क्रीडा संचालक प्रा. विजय सिंग,कृष्णा बनगर यांनी केले होते.क्रीडा संघटक समिती सदस्य कल्याण डोंबिवली जिल्हास्तरीय स्पर्धा उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, यशस्वीरित्या पार पडण्यासाठी तन-मन-धनाने क्रीडा शिक्षक खेळाडू यांच्या सहकार्यासाठी अहोरात्र खंबीरपणे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी धडपड करणारे तरुण तडफदार असे क्रीडा संघटक कृष्णा माळी यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.अनिकेत सर, ठाकुर्ली मॉडेल कॉलेजचे क्रीडा संचालक सुभाष पंजे, शेठ हिराचंद मुथा महाविद्यालयाचे प्रा.दिनेश थळे यांच्यासह बास्केटबॉल स्पर्धेत सहभागी शाळेच्या क्रीडा शिक्षक बंधू भगिनी यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विशेष सहकार्य केले.
पंच बास्केटबॉल संघटनेचे जॉइंट सेक्रेटरी दत्तात्रेय फडके, पंच एडवार्ड पोल ,
जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत मुलांच्या एकूण 42 संघाने सहभाग नोंदवला होता. तसेच वयोगट १४वर्ष,,१७वर्ष, आणि१९ वर्षाखाली
मुलींच्या २७ संघांनी सहभाग नोंदवला होता.
विजयी: मुले
१४ वर्ष.वाणी विद्यालय कल्याण पश्चिम, या स्पर्धेमध्ये
१७ वर्ष वयोगटात बी. के. बिर्ला स्कूल कल्याण,
१९ वर्ष वयोगटातील संघात बी. के. बिर्ला कॉलेजचां मुलीच्या संघाने बाजी मारली.
१४ वर्ष वयोगटात विद्या निकेतन स्कूल चा मुलींनी विजय मिळवला.
१७ वर्ष वयोगटातील स्पर्धेत सिस्टर निवेदिता डोंबिवली या शाळेने बाजी मारली.तसेच
१९ वर्ष वयोगटात मॉडेल कॉलेज ठाकुर्ली संघानेही विजय संपादन केला. विजयी संघाचे कल्याण डोंबिवली क्रीडा पर्यवेक्षक प्रवीण कांबळे यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

