अमळनेरमध्ये स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर व महेंद्र कपूर यांच्या स्मृतींना समर्पित संगीतमय संध्या संपन्न..
1 min read

अमळनेरमध्ये स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर व महेंद्र कपूर यांच्या स्मृतींना समर्पित संगीतमय संध्या संपन्न..

Loading

अमळनेरमध्ये स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर व महेंद्र कपूर यांच्या स्मृतींना समर्पित संगीतमय संध्या संपन्न..

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
स्वर सम्राज्ञी स्व.लता मंगेशकर यांची जयंती व महेंद्र कपूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त.अमळनेर येथील स्वरांजली म्युझिकल ग्रुप तर्फे त्यांनी गायलेल्या सदाबहार गीतांचा कार्यक्रम देऊन रसिकांची एक संध्याकाळ संगीतमय केली.
अमळनेरच्या जी.एस.हायस्कूलच्या आय.एम.ए.लायन्स येथे नुकताच हा रंगारंग कार्यक्रम झाला.
खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक हरी भिका वाणी,माजी आमदार डॉ बी.एस. पाटील,विद्या हजारे,शिरूडच्या सरपंच कल्याणी पाटील, व्हाईस मिडीयाचे तालुकाध्यक्ष उमेश काटे,जेष्ठ सल्लागार उमेश धनराळे यांच्या हस्ते रंगदेवता नटराजचे मूर्ती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.

*एकल गीते* –
देविदास बिरारी यांनी ‘तुम अगर साथ देने का वादा करो(हमराज),
मिलिंद पाटील -सूर तेच छेडिता(अपराध),
विद्या पाटील- सुनो सजना पपीहेने(आये दिन बहार के),बच्चे मन के सच्चे(दो कलिया)
नेहा देशपांडे-आज कल मे ढल गया (लोरी),देखा फुलोंको काटोपे(मजबूर)
युगछाया शिंगाणे- बता दु क्या लाना( पथ्थर के सनम),ज्योत से ज्योत(संत ज्ञानेश्वर) ,
पूनम अग्रवाल-मेरे घर आई एक नन्ही परी(लोरी), तू कितनी अच्छी(राजा और रंक)

*युगल गीते* –
विद्या पाटील / मिलिंद पाटील – परबत के इसपार(सरगम)
नेहा देशपांडे /देविदास बिरारी -हम तो तेरे आशिक है(फर्ज)
पूनम अग्रवाल/मिलिंद पाटील- तेरे संग प्यार मै(नागीन)
विद्या पाटील /देविदास बिरारी – जिंदगी की ना टूटे लडी(क्रांती)
युगछाया शिंगाणे/देविदास बिरारी – चल संन्याशी मंदिर मे(संन्याशी)
पूनम अग्रवाल/देविदास बिरारी – सावन का महिना
इत्यादी गाणे सादर करण्यात आली.
सूत्र संचलन वसुंधरा लांडगे यांनी केले.

 


*यांची लाभली साथ संगत* –
की बोर्ड – किशोर देशपांडे,
तबला ढोलक -केतन जोशी,देवांशु गुरव
ऑक्टोपॅड – गंगाधर कढरे
कोंगो – जनार्धन शुक्ल,
साऊंड- नितीन महाजन
या कार्यक्रमाचे आयोजन किशोर देशपांडे आणि मिलिंद पाटील यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *