स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध केल्याशिवाय पर्याय नाही-उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड
1 min read

स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध केल्याशिवाय पर्याय नाही-उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड

Loading

स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध केल्याशिवाय पर्याय नाही-उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड

शिक्षणाची कास धरत जीवनाची एक चांगली अशी वाट निवडत आपल्या भविष्यातल्या जीवनाला घडविण्यासाठी आपल्या आई-वडिलांची, कुटुंबाची परिस्थिती बदलविण्याकरता आजच्या स्पर्धेच्या युगात बुद्धीचातूर्यने ज्ञानाच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करण्याशिवाय पर्याय नाही यासाठी शालेय जीवनातच स्वतःला सजग करण्याची आवश्यकता असल्याचे मत उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी सार्वजनिक विद्यालयात शारदोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत माझी जडणघडण या विषयावर बोलताना व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थिनी कुमारी रिया पाटील होती
याप्रसंगी निवृत्ती गायकवाड पुढे म्हणाले, आयुष्यात यशस्वी व्हायचे असल्यास जिद्द, चिकाटी, आणि संयम बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे विचार मांडले .त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या जीवनातील सत्य घटना उलगडून सांगितल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी रुचिता सूर्यवंशी हिने केले .ईशस्तवन व भूपाळी कुमारी. रेश्मा झांबरे, कुमारी तृप्ती बिऱ्हाडे व इतर विद्यार्थिनींनी केले. पाहुण्यांचा परिचय श्री. के.बी. तायडे सर यांनी करून दिला .याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक .डॉ.मिलिंद बागुल यांनी आपल्या मनोगतात स्त्रियांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखत वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याची गरज असल्याचे मत मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी देवयानी माळी हिने केले, आभार यामिनी भोळे हिने मानले. विचार मंचावर पर्यवेक्षक श्री.एल.जे. पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख संतोष कचरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *