एससी एसटी आरक्षण बचाव मोर्चा यशस्वी करण्याचा एरंडोलकरांचा निर्धार
![]()
एससी एसटी आरक्षण बचाव मोर्चा यशस्वी करण्याचा एरंडोलकरांचा निर्धार
एक ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने एससी एसटी उपवर्गीकरणाचा व क्रीमी लेयरचा निकाल दिलेला आहे. सदर निकाल हा अनुसूचित जाती आणि जमातीचे वाटोळे करणार आहे. हा सरळ सरळ आरक्षणावर घाला आहे. या अनुषंगाने 7 ऑक्टोबर रोजी जळगाव येथे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन मोर्चाचे संयोजक महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा चे अध्यक्ष मुकुंद भाऊ सपकाळे यांनी एरंडोल येथील सभेप्रसंगी केले. सदर मोर्चाच्या नियोजनाची सभा श्रावस्ती पार्क, एरंडोल येथे आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी मोठ्या प्रमाणावर एससी एसटी समुदायाचे नागरिक उपस्थित होते. साहित्यिक डॉक्टर मिलिंद बागुल यांनी मोर्चाची आवश्यकता सविस्तरपणे स्पष्ट केली व मोर्चामध्ये उपस्थितीचे सर्वांना आवाहन केले. सभेचे प्रास्ताविक समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ यांनी केले.
सभे प्रसंगी साहित्यिक डॉक्टर मिलिंद बागुल, भरत शिरसाठ सर, विजय मोर्या, ईश्वर भाऊ बिऱ्हाडे, लखन भाऊ बनसोडे, डॉक्टर संदीप कोतकर, भैय्यासाहेब सोनवणे सर, प्राध्यापक नरेंद्र गायकवाड, चिंतामण जाधव सर, प्रकाश तामस्वरे सर, अण्णाभाऊ सोनवणे, रघुनाथ सपकाळे, दीपक सपकाळे, डॉक्टर भूषण जाधव, डॉक्टर शुभम जाधव, वर्षा शिरसाठ, सुलोचना खोब्रागडे, मनीषा जाधव, मिराबाई सपकाळे, अलका खैरनार, रमा ब्राह्मणे, उत्तम सरदार, बाबुराव भगत, सागर बोरसे, सिद्धांत तायडे, प्रविण बाविस्कर, शंभू बनसोडे, रितेश तंबोली, लक्ष्मण जाधव, शांताराम साळुंखे तसेच एससी एसटी समुदायातील अनेक नागरिक उपस्थित होते. सभेचे आभार प्राध्यापक नरेंद्र गायकवाड यांनी मानले. 7 ऑक्टोबर रोजी होणारा मोर्चा यशस्वी करण्याचा उपस्थितांनी संकल्प व्यक्त केला.

