अभिनव प्राथमिक सराव पाठशाळा जळगाव येथे महात्मा गांधी व लालबहादूर बहादूर शास्त्री जयंती
![]()
अभिनव प्राथमिक सराव पाठशाळा जळगाव येथे महात्मा गांधी व लालबहादूर बहादूर शास्त्री जयंती
जळगाव येथील अभिनव प्राथमिक सराव पाठशाळेत 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.श्री. अनिल झोपे यांनी महात्मा गांधीजीं व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका वैशाली राठोड यांनी केले. श्री ललित नेमाडे यांनी महात्मा गांधींच्या कार्यांची माहिती दिली शाळेचे उपशिक्षिका योगिता तळले यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याबद्दल माहिती दिली.
नंतर उन्नती सूर्यवंशी, रितिका पावरा, भार्गवी नेरकर, महेश्वरी सोनवणे, रागिनी ठाकूर, मानव धोबी, प्रतीक्षा सोनवणे या विद्यार्थ्यांनी मराठी,हिंदी व इंग्रजी भाषेतून भाषणे दिली. या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उमेश चौधरी यांनी केले. याप्रसंगी डायटचे अधिव्याख्याता श्री सी डी साळुंखे, जगन्नाथ दरंदले, लिना महाजन, जागृती भोळे, चेतन लोहार, दिपक पिंगळे,यामिनी भोळे,ज्योती इंगळे, प्रवीण वायकोळे, स्नेहल ठाकूर,शारदा धांडे उपस्थित होते.

