प्रताप महाविद्यालयाची इंग्रजी विभागाची शैक्षणिक सहल संपन्न
1 min read

प्रताप महाविद्यालयाची इंग्रजी विभागाची शैक्षणिक सहल संपन्न

Loading

इंग्रजी विभागाची शैक्षणिक सहल संपन्न* :
———————————————
● आदिवासी अकॅडमी तेजगढ,
गुजरातला भेट
● आदिवासी भाषा,साहित्य व संस्कृतीचे
अध्ययन
● सहलीचे संयोजक डॉ.जितेंद्र
पाटील,विभाग प्रमुख डॉ.धिरज
वैष्णव यांचा विशेष पुढाकार
———————————————
अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाने 20 आणि 21 सप्टेंबर 2024 रोजी गुजरातमधील तेजगढ येथे असलेल्या आदिवासी अकॅडमीला अभ्यास सहलीचे आयोजन केले होते. प्रस्तुत सहल ईंग्रजी विभाग व राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
या सहलीत इंग्रजी विभागातील १५ पदव्युत्तर विद्यार्थी सहभागी झाले होते. या सहलीमुळे विद्यार्थ्यांना भारतीय आदिवासी संस्कृती, भाषा, साहित्य आणि त्यासंबंधित अभ्यासविषयक महत्त्वपूर्ण माहिती मिळविण्याची संधी मिळाली.
प्रस्तुत अभ्यास सहलीचे समन्वयक म्हणून डॉ.जितेंद्र पाटील यांनी काम पाहिले.त्यांच्या सोबत सह-समन्वयक म्हणून प्रा.नितीन पाटील,डॉ.हेमंत पवार आणि प्रा.अमृता नेतकर यांनी कार्य केले. या सहलीचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना आदिवासी जीवनशैली आणि त्यांची सांस्कृतिक समृद्धी यांचे प्रत्यक्ष अनुभव देणे हे होते.
विद्यार्थ्यांना सहलीदरम्यान आदिवासी समाजाच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक धरोहरांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. याशिवाय, विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक प्रकल्पांची पाहणी करण्यात आली.
सदर सहलीच्या नियोजनात प्रताप महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ.धीरज वैष्णव आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण बी.जैन यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले .
या शैक्षणिक सहलीचे आयोजन खान्देश शिक्षण मंडळाच्या सौजन्याने करण्यात आले होते. मंडळाच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना विविध आदिवासी अभ्यासविषयक क्षेत्रांचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. आदिवासी अकॅडमीतील विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आदिवासी समुदायांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक जीवनाचा गहन अभ्यास करता आला.
ही सहल विद्यार्थ्यांसाठी अत्यंत लाभदायी ठरली, कारण त्यांना आदिवासी समाजातील विविध पैलू समजून घेण्याची संधी मिळाली, तसेच साहित्य आणि संस्कृतीच्या दृष्टीने व्यापक ज्ञान मिळविण्याचा अनुभव मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *