अमळनेरात ९०० विद्यार्थिनींना गर्भमुख कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण लायन्स क्लब अमळनेर, लायन्स क्लब अमळनेर मंगल तसेच कॅन्सर पेशंट एड असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम
![]()
अमळनेरात ९०० विद्यार्थिनींना गर्भमुख कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण
लायन्स क्लब अमळनेर, लायन्स क्लब अमळनेर मंगल तसेच कॅन्सर पेशंट एड असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम
अमळनेर : लायन्स क्लब अमळनेर, लायन्स क्लब अमळनेर मंगल तसेच कॅन्सर पेशंट एड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात ९ ते १८ वर्ष वयोगटातील सुमारे गरीब व गरजू ९०० विद्यार्थिनींना गर्भमुख कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. शिबिरास विशेष सहकार्य मुंदडा फॉउंडेशनचे होते.
स्तनाच्या कॅन्सर नंतर गर्भमुखाच्या कॅन्सरचे प्रमाण महिलांमध्ये सर्वाधिक अर्थात दुसऱ्या क्रमांकाचा कॅन्सर आहे. दरवर्षी भारतात ८० हजार महिलांना गर्भमुखाचा कॅन्सर होतो, म्हणजेच दर दिवसाला २०० महिलांमध्ये या कॅन्सरचे निदान होत आहे व वर्षाकाठी ४० हजार स्त्रिया ह्या कॅन्सरमुळे दगावतात. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेता लायन्स क्लब, लायन्स मंगल आणि कॅन्सर पेशंट एड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. स्वप्ना पाटील यांच्या आदित्य हॉस्पिटलमध्ये २६ रोजी एकदिवसीय मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शहरातील सुमारे ९०० विद्यार्थिनींना कॅन्सर पेशंट एड असोसिएशनच्या संचालिका डॉ. नुपूर खरे, सहा. संचालिका प्रिया प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण करण्यात आले. त्यांना लॅब अधिकारी नाजिया खान, दीपक तिरलोटकर, जयंत दांडेकर यांचे सहकार्य लाभले.
यावेळी प्रांतपाल गिरीश शिसोदिया, लायन्स क्लबचे अध्यक्ष अजय हिंदुजा, सचिव विनोद अग्रवाल, कोषाध्यक्ष महेश पवार, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. मिलिंद नवसारीकर, योगेश मुंदडा, नीरज अग्रवाल, प्रसन्ना जैन, मनीष जोशी, जळगाव जिल्हा प्रोजेक्ट चेअरमन किशोर बेहरानी, दिनेश बोहरा, लायन्स क्लब अमळनेर मंगलचे अध्यक्ष हरिओम अग्रवाल, सचिव निधीस कोचर, कोषाध्यक्ष प्रणय पारख, आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

