प्रताप महाविद्यालयात इलेक्ट्रोनिक्स क्षेत्रातील रोजगार संधी असलेल्या कार्यशाळा संपन्न
![]()
प्रताप महाविद्यालयात इलेक्ट्रोनिक्स क्षेत्रातील रोजगार संधी असलेल्या कार्यशाळा संपन्न
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालयात इलेक्ट्रोनिक्स विभाग तसेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रुसा) यांच्या संयुक्त विद्यमानाने “Embeded System and PLC Automation Career Opportunities in Electronics” या विषयांतर्गत एक दिवशीय कार्यशाळा दि २५/०९/२०२४ रोजी पूज्य साने गुरुजी सभागृह येथे संपन्न झाली. सदर कार्यशाळेचे उद्घाटन आपल्या विभागाचे प्रमुख तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य आणि मान्यवर Electrosoft कंपनीचे संचालक श्री.निलेश वाघ, राजेश ठाकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच इलेक्ट्रोनिक विभागाचे विभाग प्रमुख
डॉ.अरुण जैन हे उदघाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी होते. प्रस्तुत समारंभ प्रसंगी IQAC & RUSA समन्वयक
डॉ.मुकेश भोळे प्रा.वृषाली वाकडे,
प्रा.वैष्णवी पाटील, प्रा.कल्याणी पाटील, प्रा.अमोल अहिरे तसेच या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते श्री.राजेश ठाकरे व निलेश वाघ तसेच नीरज, हितेंद्र, भाग्येश, चैताली हे उपस्थित होते.
प्रस्तुत कार्यक्रमाच्या प्रारंभी इलेक्ट्रोनिक विभागाचे विभाग प्रमुख तथा प्राचार्य डॉ.अरुण जैन यांनी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना Embeded system and PLC Automation या बद्दल विद्यार्थ्यांना थोडक्यात सांगितले तसेच या विषयाबद्दल सविस्तर मार्गदर्शन IQAC & RUSA समन्वयक डॉ.मुकेश भोळे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. Embeded System and PLC Automation या क्षेत्रातील नोकरी व रोजगार, उपलब्ध संधी याबद्दल मार्गदर्शन केले.
प्रस्तुत कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी PLC and Embeded System मशीन्स यावर प्रत्यक्ष हाताळण्याची संधी मिळाली.
प्रस्तुत कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी डॉ.मुकेश भोळे, प्रा.वृषाली वाकडे, प्रा.वैष्णवी पाटील, प्रा.कल्याणी पाटील, प्रा.अमोल अहिरे तसेच शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी भगवान पाटील, पंकज भदाणे, पाडवी मॅडम, बाविस्कर दादा, यांनी परिश्रम घेतले.प्रस्तुत कार्यशाळेचे सूत्रसंचालन मानसी ठाकरे व आभार प्रदर्शन अमोल कापडणे यांनी मानले प्रस्तुत एक दिवशीय कार्यशाळेस प्रताप महाविद्यालयाचे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचा भरभरून सहभाग मिळाला.

