भीडेवाडा भूमीपूजन सोहळ्याच्या श्रेयवादाच्या चढाओढीत माळी महासंघ च्या कार्यकर्त्यांनी सहभागी होऊ नये-अविनाश ठाकरे राष्ट्रीय अधक्ष माळी महासंघ
1 min read

भीडेवाडा भूमीपूजन सोहळ्याच्या श्रेयवादाच्या चढाओढीत माळी महासंघ च्या कार्यकर्त्यांनी सहभागी होऊ नये-अविनाश ठाकरे राष्ट्रीय अधक्ष माळी महासंघ

Loading

भीडेवाडा भूमीपूजन सोहळ्याच्या श्रेयवादाच्या चढाओढीत माळी महासंघ च्या कार्यकर्त्यांनी सहभागी होऊ नये.

अविनाश ठाकरे राष्ट्रीय अधक्ष माळी महासंघ

आज देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्रभाई मोदी यांचे हस्ते भीडेवाडा राष्ट्रीय स्मारक भूमीपूजन सोहळा आयोजीत केला आहे. या कार्यक्रमात माळी संघ ला सहभागी करून घेतल नसल्याची खंत अनेक पदाधीकारी मला फोन वरून व्यक्त करीत आहेत.
हा कार्यक्रम सरकारी असुन अनेक विकासकामाचे भुमीपूजन होणार आहे आणि त्यातील एक भीडेवाडै राष्ट्रीय स्मारक आहे.
माळी महासंघ च्या कारकर्त्यानी प्रत्येक लढ्याला “नेकी कर दर्यामे डाल” या भावनेतून बघीतले पाहीजे. आपली भुमीका आपण पार पाडली रस्त्यावर ऊतरलो लढा यशस्वी झाला स्मारकाचे काम सुरू झाले आपले काम संपले. आता स्मारक चांगले झाले पाहीजे याकडे लक्ष देऊ.
तसेही “फुले दाम्पत्य सन्मान दिन महारॅली” आणि त्या अनुषंगाने माळी समाज एकत्रीकरण या संकल्पनेवर आपण रॅली ला सुवात केली. यात आपल्या भीडेवाडा ची दुरावस्ता आपल्या समोर आली आणी आपण स्मारकाचा लढा सुरू केला त्यात आपल्याला यश आल. संपूर्ण महाराष्ट्राने आपल्या या लढ्याची दखल घेऊन आपला प्रतिसाद देखील नोंदविला आहे. त्यामुळे श्रेयवादाच्या वादात आपण पडु नये. ज्याला शक्य असेल त्यांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे.
आपला
अविनाश ठाकरे
राष्ट्रीय अधक्ष
माळी महासंघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *