भुसावळ तालुका शालेय क्रिकेट स्पर्धेत बियाणी मिलिटरी स्कूल चे वर्चस्व.
1 min read

भुसावळ तालुका शालेय क्रिकेट स्पर्धेत बियाणी मिलिटरी स्कूल चे वर्चस्व.

Loading

भुसावळ तालुका शालेय क्रिकेट स्पर्धेत बियाणी मिलिटरी स्कूल चे वर्चस्व.

भुसावळ -महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, व बियाणी मिलिटरी स्कूल द्वारा आयोजित शालेय 14,17,19वर्षा आतील मुलांच्या व मुलींच्या स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बियाणे एज्युकेशन चे अध्यक्ष मनोज बियाणी व संगीता बियाणी होत्या सदर प्रसंगी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष,डॉ. प्रदीप साखरे . शाळेचे प्राचार्य डी एम पाटील , शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बोरसे , महाराष्ट्र क्रीडा शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. संजय निकम ,तांत्रिक समिती सदस्य प्रा . मनोज वारके,डी.आर. धांडे, वंदना ठोके यांच्यासह शाळांचे क्रीडा शिक्षक व खेळाडू विद्यार्थि उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व स्पर्धेचे उद्घाटक मनोज बियाणी यांच्या हस्ते क्रीडांगण पूजन व श्रीफळ फोडून करण्यात. अंतशालीय क्रिकेट स्पर्धेत बियाणी मिलिटरी स्कूल आणि पब्लिक स्कूलचे वर्चस्व राहिले. दिनांक 21व 22 रोजी झालेल्या क्रिकेट स्पर्धेत 14 वर्षे वयोगटातील अंतिम सामना बियाणी पब्लिक स्कूल विरुद्ध डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ यांच्यात झाला प्रथम फलंदाजी करत असताना डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल संघाने पाच षटकात मध्ये 28 धावा केल्या त्या बदल्यात बियाणी पब्लिक स्कूल संघाने पाच षटकात 29 धावा करून विजय संपादन केला. 17 वर्षे वयोगटात अंतिम सामना बियाणी पब्लिक स्कूल विरुद्ध डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ यांच्यात झाला प्रथम फलंदाजी करताना बियाणी पब्लिक स्कूल संघाने पाच षटकात 37 धावा केल्या त्या बदल्यात डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम संघाने पाच षटका मध्ये फक्त 16 धावा केल्या. 19 वर्ष वयोगटातील अंतिम सामना बियाणी ज्युनियर कॉलेज भुसावळ व पु.ओ. नाहाटा कॉलेज यांच्यात झाला. पाच षटकात या संघाने 31 धावा केल्या बदल्यात बियाणी ज्युनिअर कॉलेजने फक्त नऊ चेंडू सामना जिंकला अशाप्रकारे तिन्ही गटात बियाणी स्कूलने आपलं वर्चस्व दाखवले. पंच म्हणून हिंमत पाटील, अजय अली सर युसूफ खान व शुभम साळुंखे यांनी,रुपेश मोरे, विनय काळे, आदींनी काम पाहिले
स्पर्धा यशस्वीतेसाठी तालुका क्रीडा समन्वय डॉ. प्रदीप साखरे, हिम्मत पाटील व नरेंद्र मस्के यांच्यासह बियाणी मिलिटरी स्कूलचे शिक्षक,कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *