स्त्री ही रणरागिणी, झाशीची राणी,लक्ष्मीबाई ताराराणी, जिजाऊंचा वारसा सांगणारी सशक्त नारी- डाँ. नीलमताई गोऱ्हे
![]()
स्त्री ही रणरागिणी, झाशीची राणी,लक्ष्मीबाई ताराराणी, जिजाऊंचा वारसा सांगणारी सशक्त नारी-
डाँ. नीलमताई गोऱ्हे
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
ही रणरागिणी, झाशीची राणी,लक्ष्मीबाई ताराराणी, जिजाऊंचा वारसा सांगणारी सशक्त नारी आहे. त्यामुळे
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही महिलांचे सन्मानाची योजना आहे असे प्रतिपादन सांगलीतील दैवेज्ञ भवन येथे करण्यात आले.
महाराष्ट्राचे मुख्मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी राज्यातील आपल्या लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यशस्वी रीत्या राबवली आहे. याच योजनेच्या “मदतीचा हात एकनाथ” लाडकी बहीण सन्मान यात्रेचा विधानपरिषद महाराष्ट्र राज्य उपसभापती व शिवसेना नेत्या ना.डॉ.नीलमताई गोऱ्हे यांच्या शुभहस्ते या सन्मान यात्रेचा सोहळा सांगलीत मोठ्या उत्साहाने व आनंदाने पार पडला.
सगळ्यात प्रथम उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे यांनी उपस्थित लाभार्थी महिला आणि उपस्थीत शिवसैनिकांचे अभिनंदन केले. लाडकी बहीण योजने अंतर्गत मिळालेल्या पैशातून नियोजन करुन दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या गोष्टी खरेदी करा तसेच नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी या पैशाचा वापर करण्यचार सल्ला लाभार्थ्यांना दिला.
मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या लाडक्या बहिणीसाठी आणलेली एक महत्वकांशी योजना आहे. ही आपल्या भावाने आपल्या लाडक्या बहिणीला दिलेली भाऊबीज आहे आणि ही भाऊबीज कायमस्वरूपी राहणार आहे. काही समाजकंटक व विरोधी पक्षनेते याचा अपप्रचार करीत आहेत याचा आपण निषेध केला पाहिजे. आज आपल्या राज्यात दोन कोटीहून अधिक व सांगली जिल्ह्य़ातील सात लाखांपेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे.
काही महिलांनी उशिरा अर्ज भरले असतील त्यांच्यासाठी सुद्धा ही योजना अजून ती कायमस्वरुपी ही चालू आहे. त्यामुळे लवकरच तो निधी मिळू शकेल. आजचा मेळावा घेण्याचा हेतू हाच होता की आज आपण या निधीचा उपयोग चांगल्या प्रकारे करतोय. त्या निधीचा उपयोग करत असताना अजून आपल्याला या निधीमधून काय करता येईल याचं नियोजन सुद्धा करायचे आहे.
आपल्या सरकारने वयश्री योजना सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये साठीच्या वरच्या असणाऱ्या माणसांना वॉकर, काठी,चष्मा किंवा दाताची कवळी लागते. काहींना कानाचे मशीन लागतं या सगळ्या गोष्टी वयश्री योजने मार्फत मोफत व्यवस्था शासनाने केलेली आहे. त्याचे सुद्धा फॉर्म उपलब्ध आहेत जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आणि महिला बालविकास अधिकारी सामाजिक न्याय अधिकाऱ्यांच्याकडे ते सगळे जमा झालेले आहेत. काही अपरिहार्य कारणामुळे मी आँनलाईन उपस्थीत राहत आहे.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले भाऊ आपल्या पाठीशी उभे आहेत. ही अभिमानाची व सन्मानाची बाब आहे. तुम्ही सर्वांना मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे असे सांगू शकता. काहींच्या घरामध्ये सुद्धा पुरुष वर्गाला वाटायला लागले की फक्त बहिणींनाच महत्त्व का? तेंव्हा त्यांना सांगा तुम्ही पण मुख्यमंत्र्यांचे दाजी आहात. त्यामुळे लाडकी बहीण योजने मार्फत सर्वांशीच नाते जोडलेले आहे, त्यामुळे हे एक भावनेचं व आत्मियतेच सर्वांशी जोडलेले नाते आहे.
बहिणीच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ही योजना लोकप्रिय झाली आहे काही लोकं गैरसमज सातत्याने पसरवत आहेत, काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी चालवलेल्या गैरप्रचाराचा निषेध उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण धोरणांमुळे महिलांना राजकारणात पन्नास टक्के आरक्षण मिळणार आहे. यामुळे महिलांना खुर्चीचा मान मिळणार आहे. विविध लोकाभिमुख योजना ह्या शिवसैनिकांनी सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे आवाहन उपसभापती व शिवसेना नेत्या डाँ नीलमताई गोऱ्हे यांनी लाडकी बहीण सन्मान यात्रेत केला.
यावेळी श्रीमती सुनीता मोरे संपर्क प्रमुख यांनी करत असलेल्या कार्याचा गौरव डॉ गोऱ्हे यांनी केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे जिल्हाप्रमुख अर्चना माळी. जिल्हाप्रमुख रुक्मिणी आंबिगीर. जिल्हाप्रमुख राणी कमलाकर युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन कांबळे जिल्हा प्रमुख रोहन जाधव उपजिल्हा प्रमुख उमाकांत कार्वेकर उपजिल्हा प्रमुख अंजली खांडेकर . वर्षा निकम .विद्या गायकवाड. प्रणाली लोंढे .हसीना मुल्ला उपस्थित होते

