कल्याण डोंबिवली जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न,कल्याण डोंबिवली क्षेत्रातील जास्तीत जास्त खेळाडू स्टेट व नॅशनल पर्यंत जातील यासाठी योग्य ते प्रयत्न करणार- प्रविण कांबळे.
1 min read

कल्याण डोंबिवली जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न,कल्याण डोंबिवली क्षेत्रातील जास्तीत जास्त खेळाडू स्टेट व नॅशनल पर्यंत जातील यासाठी योग्य ते प्रयत्न करणार- प्रविण कांबळे.

Loading

कल्याण डोंबिवली जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

कल्याण डोंबिवली क्षेत्रातील जास्तीत जास्त खेळाडू स्टेट व नॅशनल पर्यंत जातील यासाठी योग्य ते प्रयत्न करणार:: प्रविण कांबळे.

ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी) जिल्हास्तरीय *जलतरण स्पर्धा* दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी सहाय्यक आयुक्त तथा नोडल अधिकारी क्रीडा विभाग यांच्या आदेशानुसार
प्रवीण कांबळे
क्रीडा पर्यवेक्षक
कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण यांचा मार्गदर्शनाखाली, खेळ प्रमुख
श्री कृष्णा बनगर यांचा नियोजनाखली वै ह भ प सावळाराम क्रीडा संकुल जलतरण तलाव डोंबिवली पूर्व येथे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
यावेळी क्रीडा पर्यवेक्षक श्री. प्रविण कांबळे यांनी श्रीफळ वाहून जलतरण स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी सर्व पुढील यशासाठी शुभेच्छा देताना सांगितले की कल्याण डोंबिवली क्षेत्रातील जास्तीत जास्त खेळाडू क्रीडा क्षेत्रात चांगली प्रगती कशी करतील व राज्य नॅशनल लेव्हल पर्यंत पोहोचण्यासाठी योग्य ते सहकार्य कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा विभागाकडून देण्याचा प्रयत्न करू असे सांगितले त्याचबरोबर सर्व पालक बंधू भगिनी आणि सर्व क्रीडा संघटक, क्रीडा शिक्षक बंधू भगिनी यांनी कल्याण डोंबिवली क्षेत्रातील क्रीडा स्पर्धा शांततेने संयमाने आणि सहकार्याने पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असेही सांगितले. कल्याण डोंबिवली क्रीडा तक्रार निवारण समिती सदस्य वाणी विद्या शाळेचे क्रीडा संघटक श्री गजानन वाघ यांनीही सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.यावेळी क्रीडा समिती सदस्य विजय सिंह
कृष्णा माळी, , प्रा.गणेश मोरे, खेळ प्रमुख कृष्णा बनगर, सहायक परिवेक्षक संतोष पाटील तसेच संदीप नरवाडे, अनंत उतेकर ,चिंतामण पाटील ,योगेश सावंत उदय नाईक लक्ष्मण इंगळे , सुनिल पाटील, मंगेश भामरे
उपस्थित होते. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त
रुपाली रेपाळे,तसेच अनिरुध्द महाडिक यांनी पंच प्रमुख असून स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्या. कल्याण डोंबिवली क्रीडा प्रसिध्दी प्रमुख मनिलाल शिंपी यांनी उत्कृष्टपणे वृत्त संकलन केले. कल्याण डोंबिवली क्षेत्रातील स्पर्धा सुरळीत आणि नियोजनबद्ध होण्यासाठी क्रीडा समिती तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त आदरणीय अंकुर आहेर व ज्येष्ठ क्रीडा संघटक मुख्याध्यापक श्री महादेव क्षीरसागर यांचे योग्य व मोलाचे मार्गदर्शन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *