कल्याण येथे हरिद्वार येथील प्रशिक्षित योग शिक्षकांकडून नि:शुल्क योग शिबिर संपन्न
1 min read

कल्याण येथे हरिद्वार येथील प्रशिक्षित योग शिक्षकांकडून नि:शुल्क योग शिबिर संपन्न

Loading

कल्याण येथे हरिद्वार येथील प्रशिक्षित योग शिक्षकांकडून नि:शुल्क योग शिबिर संपन्न

कल्याण-( प्रतिनिधी सुनील इंगळे ) : पतंजलि योग समिती आणि श्री वरूण पाटील, मंडल अध्यक्ष, भाजपा कल्याण पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमाने नि:शुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
दि. १३ ते १५ सप्टेंबर सलग तीन दिवस सदर योग शिबिर आयोजित करण्यात आले होते.
खडकपाडा रोड, येथील गोल्डन पार्क बस स्टॉप च्या जवळ असलेल्या श्री. वरूण पाटील यांच्या जनसेवालय हॉलमध्ये सदर परिसरातील अनेक बंधू-भगिनीनी या योग शिबिराचा लाभ घेतला.
या धकाधकीच्या जीवनात आरोग्यामध्ये वृद्धी कशी करावी, असा गुरुमंत्र प्राप्त केला, असे अनेक साधकांनी मनोगत व्यक्त केले.
पतंजलि योग समिती, महिला पतंजलि योग समिती मार्फत येत्या 18 सप्टेंबर पासून एक महिन्यासाठी याच ठिकाणी पहाटे योग शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
योग शिक्षक बनून स्वतः सोबत इतरांनाही योगी, निरोगी बनवून समाजासाठी विशेष कार्य करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तरी संबंधितांनी पुढील नंबर वर संपर्क साधावा…..
परमेश्वरजाधव
9320730540
सतीश मुळावेकर
9423707909
विठ्ठल सिंग राजपुत
7021176852
वर्षा जोशी
9137364313

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *