लेझीम नृत्याच्या माध्यमातून कल्याण मध्ये चिमुकल्यांकडून “मुलींवरील अत्याचार थांबवा”असे साकडे, पुण्योदय पार्क सोसायटी मधील चिमुकल्यांच्या बाप्पाचा द्वारे प्रशासनाला व समाजाला संदेश.
1 min read

लेझीम नृत्याच्या माध्यमातून कल्याण मध्ये चिमुकल्यांकडून “मुलींवरील अत्याचार थांबवा”असे साकडे, पुण्योदय पार्क सोसायटी मधील चिमुकल्यांच्या बाप्पाचा द्वारे प्रशासनाला व समाजाला संदेश.

Loading

लेझीम नृत्याच्या माध्यमातून कल्याण मध्ये चिमुकल्यांकडून “मुलींवरील अत्याचार थांबवा”असे साकडे.

पुण्योदय पार्क सोसायटी मधील चिमुकल्यांच्या बाप्पाचा द्वारे प्रशासनाला व समाजाला संदेश.

ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी ) कल्याण येथे पुण्योदय सोसायटीचा गणेश विसर्जनाप्रसंगी लेझीम खेळत “मुलींवरील अत्याचार थांबवा” असे साकडे गणपती बाप्पाला घातले!
पुण्योदय पार्क सी टाइप सोसायटीच्या गणेश विसर्जनाच्या दिवशी, ६ ते १२ वयोगटातील मुला-मुलींनी लेझीम खेळाच्या माध्यमातून बदलापूर येथे झालेल्या निंदनीय घटनेचा विरोध विविध प्रात्यक्षिकांतून सादर केला. लेझीम खेळत ‘मुली आहेत देशाच्या प्रगतीचा आधार करु नका त्यांच्याबद्दल वाईट विचार ‘, प्रत्येक स्त्रीला सन्मानाने व हिंसामुक्त जीवन जगण्याचा हक्क आहे ‘, ‘मुलीप्रमाणे मुलांनाही चांगले संस्कार द्या ‘ आणि ‘गरज आहे मुलाला घडवण्याची, संस्कार करण्याची, नजर सुधारण्याची’ असे संदेश देणारे फलक दाखवले. तसेच याप्रसंगी मुलींनी लाठीकाठी व जळत्या लेझीम ची प्रात्यक्षिके सादर केली. विशेष कौतुकाची बाब म्हणजे सोसायटीतील तरुण मुलांनी उत्तम ढोलताशा वादन केले. आर्या आहेर, ग्रीष्मा निकम, आर्या मिश्रा व अक्षरा पिल्ले या मुलींनी लाठीकाठीची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली व अहाना सिंग हिने भगवा ध्वज नाचवून प्रेक्षकांची मने जिंकली.

 

गणेश विसर्जनाच्या प्रसंगी ढोलताशांच्या तालावर धांगडधिंगा करण्यापेक्षा पारंपारिक मर्दानी लेझीम खेळत शिस्तबद्ध मिरवणूक काढण्यात यावी, यासाठी गाॅडफ्री डिसूझा, सूरज वर्मा, सागर वाघमारे यांनी पुढाकार घेतला. सेजल गुप्ता, ओम सिन्नरकर, ॲड्रिया डिसूझा या तरुणांनी पुण्योदय पार्क सी टाइप सोसायटीच्या लहान मुलामुलींना संघटित केले. लेझीम प्रशिक्षक अंकुर आहेर यांनी त्यांना लेझीमचे प्रशिक्षण दिले. गणेश विसर्जनाच्या प्रसंगी सोसायटीच्या सर्व सदस्यांनी आनंदाने सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *