महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी साठी दिनांक 14 सप्टेंबर रोजी विनामूल्य मार्गदर्शन
![]()
महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी साठी दिनांक 14 सप्टेंबर रोजी विनामूल्य मार्गदर्शन
जळगाव : राज्यात आगामी होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2024 म्हणजे (टीईटी) चे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. दिनांक दहा नोव्हेंबर 2024 रोजी परीक्षा संपन्न होणार आहे तसेच 30 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे.
यासंदर्भात नोबेल फाउंडेशन संचलित यशवर्धिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तर्फे दिनांक 14 सप्टेंबर 2024 शनिवार रोजी सकाळी दहा वाजता विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
याप्रसंगी महाटीईटी परीक्षेचे अभ्यासक्रम दोन महिन्यात अभ्यास कसा पूर्ण करावा ,परीक्षेची तयारी कशी करावी ,कोणती पुस्तके वाचावी, पेपर सोडविण्याचे तंत्र यासंदर्भात शिक्षण शास्त्र विषयतज्ञ डॉ. ईश्वर सोनगरे, स्पर्धा परीक्षांचे प्रसिद्ध लेखक जयदीप पाटील ,मिलिंद पाटील आणि गणित विषय तज्ञ रवी कुंभार मार्गदर्शन करणार आहेत.
सदर कार्यशाळा नोबेल फाउंडेशन उत्कर्ष प्लाज़ा प्रगती विद्यामंदिर समोर ख्वाजामिया दर्गा परिसर या ठिकाणी संपन्न होणार आहे. तरी अधिकाधिक संख्येने या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे. अधिक माहितीसाठी 9922004193 या क्रमांकावर संपर्क साधावा.

